पंढरी वार्ता :-गोपाळपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -आ.प्रशांत परिचारक गोपाळपूर येथे १ कोटी ७ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ
गोपाळपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -आ.प्रशांत परिचारक गोपाळपूर येथे १ कोटी ७ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ
गोपाळपूर हे मोठे तिर्थक्षेत्र असुन या ठिकानी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.त्यांना व स्थानिक नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा मानस असुन गोपाळपुरच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत असे प्रतिपादन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले.पंढरपुर तालुक्यातील गोपाळपुर येथे विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे होते. यावेळी जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेले तिर्थक्षेत्र विकास अराखड्यातील रुपये 80 लाख,चौदावा वित आयोगाचे 17 लाख रुपये, खासदार शरद बनसोडे यांच्या ङ्गंडातून लेंगरे वस्ती रस्ता 10 लाख रुपये आदी कामांचे भुमिपुजन करण्यात आले . यावेळी उपस्थितांचे स्वागत राजेंद्र लेंगरे यांनी केले. प्रस्ताविक दिलीप गुरव यांनी केले व अभार प्रा.सुभाष मस्के यांनी मानले.
यावेळी नुतन सरपंच सौ. विजया जगताप,उपसरपंच .उज्वला बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी नगराध्यक्षा साधनाताई भोसले, जि.प.च्या सभापती . रजनीताई देशमुख ,पं.स.उपसभापती अरुण घोलप,माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे, दिनकरभाऊ मोरे, पं.स.सदस्या उमाताई बंगाळे, दिलीपआप्पा घाडगे, श्रीकांत बागल,बाळासाहेब देशमुख, उपअभियंता वायदंडे, बागल, सुरेश आगावणे, राजेंद्र पाटील, हरिषदादा गायकवाड,दाजी पाटील,विठ्ठल जगताप, रा.पा.कटेकर, सत्यवान देवकुळे, ग्रा.प. सदस्य प्रशांत जाधव, शांताराम गुरव, महादेव मस्के, दत्तात्रय पिसे, भिमराव देवमारे, भुषण गुरव, उमेश अधटराव, सुरेश लेंगरे, चंदाताई तिवाडी, सुरेखा गुरव, रेश्मा लेंगरे, जनाबाई मस्के, गग्रामसेविका ज्योती पाटील लेंगरे गुरुजी,गोपाळ लेंगरे,विठ्ठल लेगरे, नागनाथ बनसोडे, रघुनाथ पवार, बाबुराव मस्के, अरुण बनसोडे, आनंद मगदुम, गोविंद क्षीरसागर, रावसाहेब लेंगर,सतीश लेागरे , भुषण माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश देशपांडे यांनी केले.
