पंढरी वार्ता :- ..अन्यथा मुख्यमंत्र्यांना रोखणार - माऊली हळणवर

 ..अन्यथा मुख्यमंत्र्यांना रोखणार  - माऊली हळणवर 

 मोहोळ - पंढरपूर रस्त्यावर  बळीराजा शेतकरी संघटना, शिवसेना, रासप यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन . 


  जगदंबा मागासवर्गीय सूतगिरणीची ची बेकायदेशीर खरेदी विक्री झाली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार माढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परंतु चौकशी च्या नावाखाली पोलीस प्रशासन वेळ काढू पणा करीतअसून तात्काळ कारवाई करावी अन्यथा मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला महापुजे पासुन रोखणार  असल्याचा इशारा  जिल्हा  अध्यक्ष  माऊली हळणवर यांनी दिलाआहे.
मोहोळ - पंढरपूर रस्त्यावर   ईश्वर वठार येथे विविध मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटना , शिवसेना, रासप यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. 
यावेळी शिवसेना  उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख म्हणाले कि , शेतकऱ्यांवर अन्याय होत  असेल तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करतेच. माढा मतदारसंघाचा या लोकप्रतिनिधी नी बिहार केला असून जनता यांच्या दहशती खाली वावरताना दिसून येते.  लोकप्रतिनिधी च्या विरोधात  आवाज  उठवला तर तो राजकिय गुंडाकरून दाबला जातो . मागील काळात अनेकांना याचा त्रास झाला असून, जर पोलीस प्रशासनाने जंगदंबा मागासवर्गीय सूतगिरणीच्या बेकायदेशीर खरेदी विक्री केलेल्या आरोपी वर तातडीने कारवाई करावी,  अन्यथा 'शिवसेना स्टाईल' ने आंदोलन केले जाईल . असा इशारा त्यांनी दिला. शिवाय साखर सम्राटांनी शेतकऱ्यांना वेळेत  बिले दिली पाहिजे, तसेच ईश्वर वठार येथील अनिशा लवटे या विद्यार्थिनीने वडील शैक्षणिक खर्च करू शकत नसल्याची खंत व्यक्त करून आत्महत्या केली होती, त्या मुलीच्या कुटूंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात यावी, साखर कारखाना कामगाराच्या थकित पगारी करण्यात याव्यात, तसेच शेतकऱ्यांना  तात्काळ पिक कर्ज  उपलब्ध करून देण्यात आली पाहिजेत. या मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. 
  यावेळी शिवसेना युवा नेते चरणराज चवरे, बळिराजाचे तालुका   अध्यक्ष माऊली  जवळेकर,जिल्हा उपाध्यक्ष  शहाजहान शेख,धनाजी मदने ,तानाजी सोनवले ,माजी सरपंच  नारायण देशमुख,रासप चे जिल्हा  अध्यक्ष पंकज देवकते,  आण्णा मेटकरी, बापू बोरकर चतूर मेटकरी,बंडू लवटे, आनंद माशाळ.  अनिल रनदिवे, आदीसह शिवसेना, बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष , आणि माढा मतदारसंघातील 42 गावातील अनेक शेतकरी उपस्थित होतो. पंढरपूर तालुका  पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला   होता. तर महसूल प्रशासनाकडून  तलाटी गणेश  गवळी हे उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव