पंढरी वार्ता:-यमाई तलाव परिसर विकास आराखडयाच्या उवर्रीत कामांना गती देण्याची मागणी तलावाभोवतीचा संपुर्ण ट्रॅक विकसीत करण्याची मागणी नगर पालीका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार- दौलत उंबरे
यमाई तलाव परिसर विकास आराखडयाच्या उवर्रीत कामांना गती देण्याची मागणी
तलावाभोवतीचा संपुर्ण ट्रॅक विकसीत करण्याची मागणी
नगर पालीका प्रशासनाकडे पाठपुरावा करणार- पहा दौलत उंबरे यांचे मनोगत
महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधीतून यमाई तलाव परिसर सर्वधन व विकास आराखडयास मान्यता देण्यात आली होती.सुरुवातीच्या टप्प्यात जवळपास अडीच कोटी रुपये यासाठी उपलब्ध झाले होते.यातून तलावाचा 1200 मिटरचा बांध विकसीत करणे,वृक्षलागवड करणे,तलावातील गाळ काढणे,पेव्हरब्लॉक टाकणे व प्रकाश व्यवस्था करणे,प्रवेशद्वार बांधणे आदी कामे करण्यात आली आहेत.मात्र त्याच वेळी येथे आणखी बरीच कामे प्रलंबीत असून या बाबत नगर पालीका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहीती यमाई ट्रॅक ग्रुपचे संयोजक दौलत उंबरे यांनी दिली आहे.
यमाई ट्रॅक ग्रुप सदस्यांच्या आजच्या झालेल्या बैठकीत यमाई तलाव परिसरातील विविध विकास कामांबाबाबत न.पा.प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.यमाई तलावाच्या सभोवती असलेल्या साडेचार किमी लांबीचा बांध हा व्यायामाच्या हेतूने चालणार्यांसाठी अतिशय महत्वपुर्ण समजला जातो.सद्याच्या ट्रॅकवरील वाढलेली गर्दी लक्षात घेता संपुर्ण तलाव परिसराचा ट्रॅक विकसीत होणे गरजेचे आहे.या बांधाच्या दोन्ही बाजुने सावलीसाठी फळझाडे लावण्यात यावीत.या तलावाच्या मध्यभागी असलेल्या दोन्ही आयलँडवर पक्षीसर्वंधन व संगोपन केंद्र उभारण्यात यावे.या तलावात पायडल बोटींग मंजुर आहे अंमलबजावणी करण्यात यावी.तुळशीवृंदावनच्या समोरील जागेत हायमॉस्ट लॅम्प बसविण्यात यावेत.तलावाच्या बांधावर वाढलेली काटेरी झाडे काढावीत.प्रवेशद्वारावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत व सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात यावा आदींसाठी नगर पालीका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले.