पंढरी वार्ता:- सावळ्या विठ्ठलाच्या शेेतीचे उत्पन्न किती ? शेतकरी भाविकांमध्ये उत्सुकता
पंढरी वार्ता:- सावळ्या विठ्ठलाच्या शेेतीचे उत्पन्न किती ?
शेतकरी भाविकांमध्ये उत्सुकता
कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ॥ या अभंगातून संत सावता माळी यांनी श्री विठ्ठलाच्या सगुण साकार रुपाला शेतकर्याचा वेष परिधान करुन आपल्या मळ्यात भक्तीच्या शक्तीने पाचारण केले होते.तमाम महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकर्यांच्या या दैवताला कुणी विष्णूचा आठवा अवतार संबोधले तर कुणी बौध्दावतार समजले मात्र भक्तांना मुखी नाम हाती मोक्ष । अवघी साक्ष बहुतांशी ॥ याचा प्रत्यय देत आपल्या शेतात राबत असतानाही केवळ नामस्मरणातून या निर्गुण निराकार देवाची भक्ती करता येते हे संत तुकोबारायांनी आपल्यहा अभंगातून प्रमाणीत केले आहे.अशा सावळ्या विठ्ठलाला आपल्या जमीनी दान करुन ज्याचे होेते त्याला दिले असा भाव व्यक्त करीत या महाराष्ट्रातील अनेक शेतकर्यांनी आपला देह त्यागला आणि या जमीनी परमात्मा पांडुरंगाच्या नावावर नोंदल्या गेल्या.एकीकडे सद्या महाराष्ट्रात शेतकर्यांची मोठी अहवेलना होत असताना व शेती तोटयात असताना भाविकांनी श्रध्देने अर्पण केलेल्या जमीनीचा मालक झालेला सावळया विठ्ठलाची शेती तरी फायद्यात आहे का ? विठ्ठलाला या शेतीचे किती उत्पन्न मिळाले याची उत्सुकता शेतकरी भाविकांना लागली आहे.
विठ्ठलास भक्तीभावने अर्पण केलल्या परंतू कायदेशीर द्रष्टया विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या नावे असलली मौजे सोनई ता.नेवासा जिल्हा अहमदनगर येथे 4 हे.91 आर,मौजे पापरी ता.मोहोळ जि.सोलापूर येथे 2 हे 24 आर.मौजे वडाळा ता.उत्तर सोलापूर येथे 6 हे.81 आर, मौजे वाटपूर ता.नांदगाव जि.अमरावती येथे 1 हे.18 आर,मौजे गावनेर तळेगाव जि.अमरातवती येथे 78 आर,मौजे कंझरा जि.अमरावती येथे 1 हे.44 आर,मौजे चिखली वैध जि.अमरावती येथे 5 हे.78 आर,मौजे सावरगाव जिल्हया यवतमाळ येथे 7.49 आर,मौजे नाथ्रड जि.यवतमाळ येथे 94 आर,मौजे कारखेडा जि.यवतमाळ येथे 1 हे.79 आर,माजे निंभा जि.वर्धा येथे 12.16 आर,मौजे सावंगी जिल्हा वर्धा 3.84 आर,मौजे खानगाव जि.नागपूर येथे 1 हे 25 आर,मौजे धापेवाडा जि.नागपूर येथे 3 हे.12 आर,देवुळगाव जि.अहमदनगर येथे 3 हे.10 आर,मौजे सलाबतपुर जि.अहमदनगर येथे 1 हे.40 आर.यासह महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी श्रध्दाळू भाविकांनी विठ्ठलास अर्पण केलेल्या शेतजमीनी आहेत.पंढरपूर तालुक्यातही मोठया प्रमाणात विठ्ठलदेव या सदरी जमीनी असल्याची चर्चा असून कासेगाव सारख्या बागायती भागातही अजुनही विठ्ठलास अर्पण केलेल्या जमीनी आहेत मात्र त्याची अधिकृत नोंदच समितीकडे नाही असी चर्चा कासेगावात होताना दिसून येते.
या शेतजमीनीतून विठ्ठलास म्हणजेच मंदीर समितीस किती उत्पन्न मिळाले याची माहीती जाणून घेण्याची उत्सुकता भाविकामध्ये असून एकीकडे शेती तोटयात जात असल्याने सामान्य शेतकरी आत्महत्या करीत असताना या जगाचा नियंता असलेला सावळा विठ्ठल तरी शेतीत फायद्यात आहे का ? असा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकर्यांना पडला आहे.