पंढरी वार्ता :- विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानला महाराष्ट्र शासनाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर शासनाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा पंढरपूरला प्रथमच बहुमान

 विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानला महाराष्ट्र शासनाचा समाजभुषण पुरस्कार जाहीर
शासनाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा पंढरपूरला प्रथमच बहुमान

विश्‍वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानने गेल्या 14 वर्षापासून सामाजिक क्षेत्रा
त केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2017-18 या वर्षाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्कारासाठी 61 व्यक्तिं व सहा संस्थांची निवड करण्यात आली आहे यामध्ये विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा समावेश आहे.नुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती आदी विविध समाजातील लोकांसाठी कार्य करणार्‍या कार्यकर्ते व संस्थांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात येतात. सन 2017-18 या वर्षाच्या पुरस्कारांसाठी संस्था व व्यक्तिंची निवड समितीने केली आहे.3 जुलै रोजी नागपूर येथे भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
       या बाबत अधिक माहीती देताना विश्‍वभषुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक डि.राज सर्वगोड म्हणाले की,तब्बल दहा वर्षानंतर सोलापूर जिल्ह्यात हा पुरस्कार प्राप्त होत आहे.तर पंढरपूर शहर तालुक्यात पुरस्काराचा मानकरी ठरलेली ही पहीलीच संस्था आहे.प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 14 वर्षापासून आम्ही करीत आलेल्या समाजिक कार्याची शासनस्तरावर दखल घेतली गेल्याने समाधान वाटते.प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही नैसर्गीक आपत्ती पिडीतांना व पुरग्रस्तांना शासकिय मदत मिळवून देणे,सुशिक्षीत बेरोगारांसाठी वेळोवेळी कार्यशाळेचे आयोजन करणे,एडसबाबत जनजागरण मोहीम राबवीणे,दुष्काळी परिस्थीतीत आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे,पाणी बचतीसाठी जनजागृती अभियान राबवीणे,नळाच्या तोटयांचे मोफत वाटप करणे,वनाराई परिसरात पशुपक्षासाठी पाणी पुरवठा करणे,अंध दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करणे,नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करुन गरजुंना मोफत चष्मे वाटप करणे, गरजुंना तातडीने व कमी दरात रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य करणे,चंद्रभागेच्या वाळवंटात निर्मल कलश ठेवण्यासाठी व वाळवंट स्वच्छतेसाठी पाठपुरावा करणे,ग्रामिण भागातील हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मोफत एस.टी.पास वाटप करणे.पत्रकार दिन व डॉक्टर्स डे साजरा करीत असताना समाजातील व्यक्तीविशेष कार्याची दखल घेवुन गौरव करणे यासह अनेकविध कामे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली आहेत.तर समाजातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांचा आतापर्यंत शंभर पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे.
     प्रतिष्ठानच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनाने हा पुरस्कार संस्थेस जाहीर केला आहे.हा पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच नगरसेवक डि.राज सर्वगोड व त्यांचे सर्व सहकारी,प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री  ना.रामदास आठवले,आ.भारत भालके,संसदरत्न खासदार धनंजय महाडिक,आ.दत्तात्रय सावंत,चेअरमन कल्याणराव काळे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव