पंढरी वार्ता:- ‘बडया’ शिक्षण संस्थांमधील शिक्षकांचे पगार,पात्रता आणि अनुभवाची आता पालकांनीच पडताळणी करणे गरजेचे ! पालक संघटन मजबूत होण्याची गरज

पंढरी वार्ता:- ‘बडया’ शिक्षण संस्थांमधील शिक्षकांचे पगार,पात्रता आणि अनुभवाची आता पालकांनीच पडताळणी करणे गरजेचे !
पालक संघटन मजबूत होण्याची गरज 
पुणे स्थित सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षकांच्या थकित वेतनाचा प्रश्‍न सावित्रीमाई फुले पुणे विद्यापिठाच्या अधिसभेत  गाजला होता तर अधिसभा सदस्यांनी मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरत 17 महिन्यापासून प्राध्यापकां
ना वेतन मिळाले नसल्याने  संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी अधिसभा सदस्य डॉ. पंकज मिनियार यांनी केली होती.दिल्लीस्थीत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने या संस्थेवर कारवाईही केली होती.मात्र हा प्रश्‍न केवळ सिंहगड संस्थेचा नसून, अन्य काही संस्थेत शिक्षकांना वेळेत वेतन दिले जात नाही हेही अधिसभा सदस्यांनी निदर्शनास आणून दिले होते.हीच परिस्थीती सोलापूर जिल्ह्यातही असून या जिल्ह्यातील अनेक खाजगी शिक्षण संस्था आपल्या संस्थेच्या प्रसिध्दीसाठी लाखो रुपये खर्च करुन जाहीरात बाजी करतात मात्र या संस्थांमध्ये काम करीत असलेल्या शिक्षकांची व कर्मचार्‍यांची अतिशय अहवेलना केली जात असून एकीकडे राज्य शासनाने 2012 पासून शिक्षक भरतीवर बंदी आणली आहे त्याच वेळी राज्यातील बी.एड.व डि.एड.महाविद्यालयातून प्रतिवर्षी शिक्षणशास्त्राची पदवी अथवा पदवीका घेवून हजारो विद्यार्थी बाहेर पडत आहेत.अशा बेरोगारांना अल्प वेतनावर व कायमस्वरुपी नोकरीची कुठलीही हमी न देता राबवून घेतले जात असल्याचे दिसून येते.
      पंढरपूर शहरात नकतेच एका महिला सामाजिक कार्यकर्तीने गळफास लावून घेण्याचा प्रकार घडल्यानंतर अशा खाजगी संस्थांची मनमानी पुन्हा एकदा समोर आली आहे.सिंहगडवर एआयसीटीईने प्रवेशबंदीची कारवाई केल्यानंतर या संस्थेने न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देत हा गंभीर विषय बाजुला पडला असला तरी इतरही अनेक खाजगी शिक्षणसंस्थाचालक मनमानी पध्दतीने फी व इतर शुल्क आकारत पालकांना वेठीस धरत असले तरी प्रत्यक्षात अशा संस्थामध्ये कार्यरत असलेले शिक्षक,त्यांची शैक्षणिक पात्रता,त्यांनी प्राप्त केलेले विशेष प्राविण्य व अनुभव या बाबत पालकांनाही अंधारात ठेवत असल्याचे दिसून येते.अशा अनेक खाजगी बडया शिक्षण संस्थाचे कॅम्पस,इमारती व संस्थाचालकांची प्रतिष्ठा याला भाळून पालक अशा शाळांमध्ये आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी धावाधाव करतात.शासनाने निर्धाती केलेल्या फी शिवाय इतर शुल्काच्या नावाखाली होणार्‍या जबरीवसुलीचा फटका सहन करतात.मात्र अनेक संस्थाचालक वशिल्याने व आपल्या मर्जीतील शिक्षकांची पात्रता न तपासता नियुक्ती करुन अल्पवेतनात त्यांना राबवून घेतात हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.अशा अनेक बडया शिक्षण संस्थामध्ये आजही अनेक शिक्षक अक्षरश: 4 थ्या वेतन आयोगाच्या काळातील पगार घेवून काम करत असल्याची चर्चा आहे.मात्र बेकारीच्या भीती पोटी हे नोकरीच्या सुरक्षेची हमी नसलेले शिक्षक तोंड उघडत नाहीत.

       पंढरपूर शहर व तालुक्यातील अशा अनेक बडया शिक्षण संस्थामध्ये ‘स्टेटस’जपण्याच्या हेतूने अनेक उच्चशिक्षीत पालक आपल्या पाल्यांना अशा शिक्षण संस्थामध्ये गलेगठ्ठ फी भरुन पाठवतात मात्र त्याच वेळी त्यांनी येथील कर्मचार्‍यांच्या वेतन,पात्रता आणि अनुभव यासाठी जागरुक असणे गरजेचे आहे.अन्यथा सुशिक्षीत बेकारांच्या हतबलतेचा फायदा उचलत शिक्षण संस्था चालक अल्पवेतनावर त्यांना राबवून घेत राहणार आहे.आणि प्रपंचाचा गाडा ओढण्यात असमर्थ ठरलेले अनेक शिक्षक तणावात वावरत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
                                बड्या शिक्षण संस्थेचे प्रतीकात्मक चित्र 



Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव