पंढरी वार्ता:-अर्बन बॅँक ते अंबाबाई पटांगण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचा आंदोलनाचा इशारा

अर्बन बॅँक ते अंबाबाई पटांगण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे 
 राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचा आंदोलनाचा इशारा


 अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक या रस्त्याचे काम निकृष्ट पध्दतीने होत असून या ठिकाणी कॉक्रीटीकरणापुर्वीचा बेस म्हणून मुरुमाऐवजी माती वापरली जात आहे.तसेच अनेक ठिकाणी टाकण्यात आलेल्या पाईपलाईन फुटक्या असल्याचे निदर्शनास येते.तर तयार करण्यात येत असलेले चेंबरचे बांधकामही निकृष्ट पध्दतीने होत असल्याचे दिसून येते.त्यामुळे या परिसरातील नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळेच आज आम्ही लेखी निवेदनाद्वारे नगर पालीका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे.या निवेदनाची दखल न घेतल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेवून राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन केले जाईल अशी माहीती शहराध्यक्ष रशीद शेख यांनी दिली आहे.   
           याबाबत पंढरी वार्ताशी बोलताना रशीद शेख म्हणाले की, पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व कॉक्रीटीकरणाचे काम सद्या संथगतीने सुरु असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असलेले दिसून येते.रस्ता खोेेेदल्या नंतर भरुन घेण्यासाठी मुरुमाऐवजी काळी माती वापरली जात आहे.त्यामुळे भविष्यात हा रस्ता खचला जाण्याची शक्यता आहे. या कामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.मात्र त्याची नगर पालीका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.हे काम निकृष्ट होत असताना दुर्लक्ष केले जात आहे.तरी आपण पालीका प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेवून कारवाई करावी अन्यथा प्रशासनास नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
   राष्ट्रवादी कॉगेे्रस अल्पसंख्याक सेलच्या तक्रारीची दखल घेत आज नगर पालीकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी भेट दिली यावेळी मा.नगरसेवक अमित डोंबे,रशिद शेख आदींसह परिसरातील रहिवाशांनी आपल्या भावना मुख्याधिकार्‍यांसमोर प्रकट केल्या.यावेळी मुख्याधिकार्‍यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेवू व योग्य त्या सुचना दिल्या जातील असे आश्‍वासन दिले. 
   

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव