पंढरी वार्ता:-‘पाझर’च्या यशानंतर दिग्दर्शक अनिल केंगार यांच्या ‘विष्टा’या दुसर्‍या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण

 पंढरी वार्ता:-‘पाझर’च्या यशानंतर दिग्दर्शक अनिल केंगार यांच्या ‘विष्टा’या दुसर्‍या चित्रपटाचे चित्रीकरण पुर्ण 


पाझर या मराठी चित्रपटाच्या यशानंतर पंढरपूरातील प्रतिथयश दिग्दर्शक अनिल केंगार यांच्या विष्टा या दुसर्‍या चित्रीकरणास प्रारंभ झाला आहे.शिरढोण येथुन या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली तर शेवटचे चित्रीकरण तारापूर येथे करण्यात आले.
   या बाबत अधिक माहीती देताना दिग्दर्शक अनिल केंगार म्हणाले की,या चित्रपटामध्ये समाजातील असलेले अज्ञान आणि अंधश्रध्दा दूर करण्याच्या हेतूने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.या चित्रपटाचे कथा व संवाद लेखन मी स्वत: केले असून या चित्रीपटाचे संपुर्ण चित्रीकरण पुर्ण झाले आहे.आता तांत्रीक बाबींची पुर्तता झाल्यानंतर लवकरच हा चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीला येणार आहे.
     या चित्रपटाचे निर्माते आप्पासो वाघमारे आणि नवनाथ गोडसे यांनी चित्रीकरण पुर्ण झाल्यानंतर समाधान व्यक्त करीत प्रतिक्रीया देताना म्हणाले की,या चित्रपटाचा आशय आम्हास खुप भावला होता.आयुष्यात येवून काहीतरी केल्याचे समाधान आम्हास या चित्रपटाच्या निर्मितीमुळे प्राप्त होत आहे.
     विष्ठा या चित्रपटातून आक्रोश फेम अभिनेत्री सुष्मिता माने,पाझर फेम ओम जोजारे,आरती वाईकर तसेच नोवदीत कलाकार आरती गायकवाड,वर्षा महिंद्रकर,चंदना सुढाळ,प्राजक्ता जाधव,मंगल ओहोळ,विशाल बनसोडे,वंदना कुडाळकर,गौरी साकी,संद्या साकीव बालकलाकार कांचन बनसोडे,तेजू कुडाळकर,शिवानी अधटराव,प्रतिक गोडसे यांनी अभिनय केला आहे. पंढरपुरातील नावाजलेले कलाकार पाझर फेम अजित व्यवहारे,शिवछत्रपती राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकार रविंद्र शेवडे त्याच बरोबर दिग्गज कलाकार पांडुरंग मोरे यांनी प्रमुख भुमिका साकारल्या आहेत.सहकलाकार म्हणून भारत बनसोडे,सचिन माने,बंडू घाडगे,ईश्‍वर पाटोळे,गुरुनाथ मोरे,सुरेश कोळी,अनिकेत देशपांडे,गणेश रणदिवे यांनी काम केले आहे.या चित्रपटाचे छायाचित्रण योगेश संगम  यांनी केले आहे.या चित्रपटास संगीत धनंजय-जब्बार(सोलापूर) या जोडगोळीने दिले असून विशालाक्षी एंटरटेनमेंटचे जगदीश जोजारे यांची प्रस्तुती आहे.

                                                पहा या चित्रपटातील काही क्षणचित्रे 

           

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव