कृषी पंढरी कृषी महोत्सवाचे ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते उदघाटन



कृषी पंढरी कृषी महोत्सवाचे ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते उदघाटन 


येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भव्य स्वरुपात आयोजीत करण्यात आलेल्या कृषी पंढरी कृषी महोत्सवाचे उदघाटन राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ना.महाजन यांनी कृषी पंढरी कृषी महोत्सवाच्या ठिकाणी विविध स्टॉलला भेटी देवून कृषी विषयक माहीती जाणुन घेतली .अशा उपक्रमामुळे शेतकरी आधुनिक शेतीकडे वळण्यास मदत होणार असल्याचे यावेळी ना.महाजन यांनी सांगीतले.
   या उदघाटन प्रसंगी परिवहन मंत्री दिवाकर रावते,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजयकुमार देशमुख,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे,पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.सुधाकरपंत परिचारक,आ.सुरेश धस,आ.प्रशांत परिचारक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे,भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल ,
पुणे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,संदीप गिड्डे आदी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की,वारकरी हे शेतकरीच आहेत.त्यांची सेवा करण्याचे सामर्थ्य आम्हास मिळो.कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेकर्‍यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची परिपुर्ण माहीती घेवून शेती केल्यास शेती नक्कीच फायद्याची ठरणार आहे.शेतकर्‍यांची पुढची पिढी आता शिकत आहे.त्यांनी आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या पारंपरीक शेती करणार्‍या परिवारासाठी मार्गदर्शक  म्हणून केला तर राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लागणार आहे. 
    या कृषी प्रदर्शनास आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठया       प्रदर्शनास भेट देत असतात.      

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव