पंढरी वार्ता:- जात वैधता प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेतल्याने मा.उपसभापतीकडून हात तोडण्याची धमकी

 जात वैधता प्रमाणपत्राबाबत आक्षेप घेतल्याने मा.उपसभापतीकडून हात तोडण्याची धमकी

माजी सैनिक महादेव नागटिळक यांची पोलीसात तक्रार

ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असतानाही ते सादर केले की नाही या बाबत तहसिलदार पंढरपूर यांच्याकडे माहीतीच्या अधिकारात माहीती घेवून सदर वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे रितसर तक्रार केल्यामुळे चिडून ‘तुझे हात तक्रारी अर्ज करण्यासाठी फार सळसळतात,वारंवार तक्रारी करतो’ म्हणून पंचायत समितीचे मा.उपसभापती विजयसिंह देशमुख यांनी  हात तोडण्याची धमकी दिल्याची तक्रार कासेगाव येथील माजी सैनिक व मा.ग्रामपंचायत सदस्य महादेव नागटिळक यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.या तक्रारीची प्रत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनाही देण्यात आली आहे अशी माहीती पंढरी वार्ताशी बोतलाना महादेव नागटिळक यांनी दिली आहे.
            पंढरपूर तालुकयातील कासेगाव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.कासेगाव ग्रामपंचायतीच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून  विजयी झालेले उमेदवार भगवान पांडुरंग वाघमारे यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र  तहसिलदार पंढरपूर यांच्याकडे सादर केले नाही असा लेखी अहवाल महादेव नागटिळक यांनी प्राप्त केल्यानंतर या बाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली होती.या बाबत बुधवार दिनांक 25 जुलै रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासमक्ष या अर्जाची सुणावणी झाली.या तक्रारीचा राग मनात धरुन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेला अर्जच काढून घ्यावा म्हणून महादेव नागटिळक यांना मंगळवार दिनांक 24 जुलै रोजी वरील प्रमाणे धमकी देण्यात आल्याचे त्यांनी आपल्या तक्रारी अर्जात नमूद केले आहे.




Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव