पंढरी वार्ता :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुस्ते येथील सचिन शिंगण या तरुणाचा जलसमाधीचा प्रयत्न प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुस्ते येथील सचिन शिंगण या तरुणाचा जलसमाधीचा प्रयत्न
प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार जाणीवपुर्वक राजकारण करीत असून समाजास वेठीस धरत आहे.शांततापुर्ण मार्गाने समाजाने लाखोंच्या संख्येत सहभागी होऊन मुक मोर्चे काढले तेव्हाही सरकारने मराठा समाजास केवळ आश्वासन देवून व प्रत्यक्षात वेगळीच कृती करुन फसवले आहे.आता मराठा समाजाच्या भावना संतप्त झाल्या असून मराठा समाजाच्या आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्यासाठी सुस्ते येथील तरुण सचिन शिंगण याने आज जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला असून या युवकास कार्यकर्त्यांनी तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
तीनच दिवसापूर्वी सचिन शिंगण याने दिला होता इशारा

