पंढरी वार्ता :- व्ही.एन.एस. ग्रुपचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

व्ही.एन.एस. ग्रुपचा ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव   

बांधकाम क्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक कमावलेल्या व्हि. एन.एस.गृपच्या कार्याची दखल घेऊन इंडिया न्युज या चॅनेल ने  महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या  हस्ते शनिवार दि.28 हाॅटेल ट्रायडेंट KBC  या ठिकाणी देण्यात आला. 
  इंडिया न्युज चॅनलच्या वतिने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय काम काम केल्याबद्दल व्हि. एन.एस.गृप या कंपनीला देन्यात आला या वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे,ना. पंकजाताई मुंडे , प्रफुल्ल पटेल अभिनेते ॠशी कपूर,ना. किर्ती कुल्हारी , गाईका अनुराधा पोडवाल  ईतर अनेक मान्यवर उपस्थित होते या वेळी   vns चे सचिन भोसले,संतोष वायचळ,नितिन जाधव,शितल लोखंडे,उत्तम नाळे उपस्थित होते.  

   या पाच जणांनी ग्रामिण भागातून एकत्र येऊन व्हि.एन.एस.गृपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किंमतीत सुमारे पाच लाख रो हाऊस बांधण्याचा संकल्प केला असुन सध्या माळेगाव,फलटण,निरा,पंढरपूर,मेढा,आळेफाटा,पाचगणी,माहोळ याठिकाणी कामकाज सुरू आहे. यांचे सव॔ स्तरातून कौतुक होत आहे.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव