पंढरी वार्ता :- वारकऱ्यांची पाऊले वळत आहेत कृषी महोत्सवाकडे शासनाचा कृषी विभाग मात्र उदासीन
वारकऱ्यांची पाऊले वळत आहेत कृषी महोत्सवाकडे
कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर व शुअर शॉट
इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित केल्या
जाणाऱ्या कृषी प्रदर्शनाचे यंदाचे ३ रे वर्ष आहे. यंदाचा हा कृषी महोत्सव आषाढी
वारीतील एक प्रमुख आकर्षण ठरत आहे. यावर्षी कृषी महोत्सवामध्ये प्रथमच माहिती व
जनसंपर्क महासंचानलयाच्या वतीने संवाद वारी हे शासनाच्या विविध योजनांची माहिती
देणारे दालन उभारण्यात आले आहे. याशिवाय मोठी यंत्रे, औजारे व विविध साधनांची
प्रात्याक्षिके तसेच देशी गायींचे प्रदर्शन व भाग्यवान विजेत्याला ट्रॅक्टर बक्षीस
यामुळे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात येणारे भाविक आपसूकच कृषी
प्रदर्शनाकडे वळत आहेत. ५ दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये ३०० पेक्षा
जास्त
स्टॉल्सचा समावेश आहे. २५ जुलै पर्यंत हा कृषी महोत्सव चालणार असून पहिल्याच दिवशी
या प्रदर्शनास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
शासनाचा कृषी विभाग मात्र उदासीन

या कृषी
महोत्सवाची सुरुवात औपचारिक उद्घाटनाने झाली असून मुख्य उद्घाटन सोहळा दि. २२ जुलै
रोजी सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
यावर्षी या कृषी
महोत्सवामध्ये आगर्वूड लागवड, खजूर शेती, मधमाशी पालन, शेळीपालन, रक्तचंदन लागवड,
बांबू लागवड, मोत्यांची शेती अश्या नवनवीन कमी उत्पादन खर्च व जास्त उत्पन्न अशा
पिकांची माहिती देणारे उद्योजक प्रदर्शनामध्ये शेतीविषयक तंत्रज्ञान सादर करीत
आहेत.