पंढरी वार्ता :- मराठा आरक्षणासाठी घटना दुरूस्ती करा ! शरद पवार यांनी सुचविला उपाय

 मराठा आरक्षणा साठी घटना दुरूस्ती करा !

शरद पवार यांनी सुचविला उपाय 










मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटना दुरूस्ती करणे शक्य आहे. 
घटना दुरूस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते. यासाठी आपण केंद्रातील व राज्यातील विरोधी पक्षांचीही समजूत काढू, केंद्रात भाजपचे स्पष्ट बहुमत आहे त्या मुळे कायदेशीर अडथळा दूर करण्यासाठी घटनादुरुस्ती करणे हा पर्याय आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केली .   

  कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला शरद पवारांनी हजेरी लावली तत्पूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील वक्तव्य केले आहे . 
      गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यास आता  अतिशय उग्र लढ्याचे  रूप प्राप्त झाले असून मूक मोर्चे काढूनही सरकार दाद देत नाही हे लक्षात आल्याने मराठा युवक संतप्त झाले आहेत . एकीकडे सरकार आरक्षण देण्यात कायदेशीर अडथळा येत असल्याचे कारण पुढे करीत आहे त्याच वेळी मराठा समाजाने चर्चेसाठी पुढे यावे असे आवाहन मुख्यमंत्री करीत आहेत. पण मराठा समाजात सरकारशी चर्चा करण्यास मोठा विरोध व्यक्त होत असल्याने कुणीही पुढाकार घेण्याचे धाडस करत नसल्याने आंदोलनाला अधिक उग्र स्वरूप प्राप्त होत आहे . 
    आता शरद पवार यांनी थेट घटना दुरुस्तीचा पर्याय पुढे केल्याने एक प्रकारे राज्य सरकारला दिलासा मिळाला असून लोकसभेत व राज्यसभेत घटना दुरुस्ती विधेयक मांडून मराठा समाजास आरक्षण द्यावे अशा आशयाचा ठराव विशेष अधिवेशन बोलावून राज्यसरकार करू शकते . 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव