पंढरी वार्ता :- आरक्षणासाठी धनगर समाज नागपूर ते पंढरपूर लॉँग मार्च काढणार !
आरक्षणासाठी धनगर समाज नागपूर ते पंढरपूर लॉँग मार्च काढणार !
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भात सरकारने कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याने व वारंवार खोटी आश्वासने देऊन सरकार धनगर समाजाची फसवणूक करत असल्याने धनगर समाज आता रस्त्यावर उतरणार असून नागपूर ते पंढरपूर धनगर समाजाची जनजागरण यात्रा काढण्यात येणार आहे.5 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या वतीने पांडुरंग मेरगळ यांनी सोमवारी औरंगाबादेत दिली.

धनगर समाज आरक्षण समन्वय समितीच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक औरंगाबादेत पार पडली. यासाठी पुणे, बारामती, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, धुळे जिल्ह्यातील धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.