पंढरी वार्ता :- मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी



मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

  

क्रांतिवीर दामोदर चाफेकर  स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात गोंधळ 

 पिंपरी चिंचवड येथील घटना 

५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले


सोमवारी सकाळी पिंपरी चिंचवडमध्ये क्रांतिवीर दामोदर चाफेकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजना साठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी  जोरदार घोषणाबाजी केल्याने ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे !मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत मुख्यमंत्र्यांना शहरात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा देत हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांचा हा हेतू सफल होऊ दिला नाही. सकाळ पासून कार्यक्रम स्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्‍यात आला होता. मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करणार्‍या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव