पंढरी वार्ता:- कोळी महादेव जमातीचे दाखले अडवू नका
ना.दिलीप कांबळे यांचे प्रांताधिकार्यांना आदेश
ठोस कार्यवाहीचे पहील्यांदाच आदेश
सामुहिक जलसमाधीच्या इशार्यानंतर घेतली बैठक
सोलापूर जिल्ह्यात अदिवासी कोळी महादेव जमातीचे अस्तित्व आहे हे वेळोवेळी जात पडताळणी समितीने पडताळणी करुन दिलेल्या जातीच्या दाखल्यामुळे सिध्द झाले आहे.जर आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत जोडून कोणी अनुसुचीत जमातीच्या दाखल्यासाठी अर्ज दाखल करत असेल तर त्यांचे दाखले अडवू नका असा थेट आदेश सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.दिलीप कांबळे यांनी दिले आहेत.महर्षी वाल्मिकी संघाने सामुहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.या पार्श्वभुमिवर येथील शासकिय विश्रामगृहात ना.दिलीप कांबळे,पालकमंत्री विजयकुमार देशमुख,आ.भारत भालके,सहाय्यक जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,प्रांताधिकारी सचिन ढोले,विभागीय जात पडताळणी समितीचे उपायुक्त श्री गोलाईत व जातपडताळणी विभागाचे व समाजकल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक गणेश अंकुशराव यंानी कोळी महादेव जमाती विद्यार्थ्यांची जातीच्या दाखल्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून अडवणूक होत असून सबळ पुरावे देवूनही दाखले देण्यास अडवणूक केली जाते हे पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले.आवश्यक ते कागदपत्रे सोबत जोडलेली असताना
ही जातीच्या दाखल्यासाठीचे अर्जही दाखल करुन घेतले जात नाहीत आणि जर दाखल करुन घेतले तर वर्षे वर्षे हेलपाटे मारावे लागतात अशी तक्रार केली.आम्ही गेली पंधरावर्षे विविध मार्गाने आंदोलने करीत आलो आहोत.आता आमचा संयम संपला असल्याचे त्यांनी सांगीतले.
ही जातीच्या दाखल्यासाठीचे अर्जही दाखल करुन घेतले जात नाहीत आणि जर दाखल करुन घेतले तर वर्षे वर्षे हेलपाटे मारावे लागतात अशी तक्रार केली.आम्ही गेली पंधरावर्षे विविध मार्गाने आंदोलने करीत आलो आहोत.आता आमचा संयम संपला असल्याचे त्यांनी सांगीतले.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे जातीच्या दाखल्यासाठी दाखल असलेली प्रकरणे व सोबत जोडलेले पुरावे व वैधता प्रमाणपत्रे स्वत: तपासून पाहीले.अनुसुचीत जमातीच्या दाखल्यासाठी प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी अडवणूक करु नये असे आदेश यावेळी ना.दिलीप कांबळे यांनी दिले.
या बैठकीत पालकमंत्री ना.विजयकुमार देशमुख यांनी याबाबत अधिकार्यांची झाडाझडती घेत जात वैधता पडतळणी समित्या शासनाने नियुक्त केलेल्या आहेत.योग्य ते सबळ पुरावे दाखल करुन दाखल्यासाठी केलेल्या अर्जाची तहसिलदार व प्रांताधिकारी अडवणूक करु नये अशा सुचना केल्या.
या वेळी आ.भारत भालके यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात कोळी महादेव जमातीचे मोठया प्रमाणात वास्तव्य आहे.या सामाजाचा जातीच्या दाखल्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे.शासनस्तरावर यासाठी योग्य तो ठोस निर्णय घेतला जावा अशी मागणी केली.



