पंढरी वार्ता :- प्रभाग क्र.९ मध्ये पिण्याच्या पाईनलाईनच्या व काँक्रीटीकरण कामाचा आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ

प्रभाग क्र.९ मध्ये पिण्याच्या पाईनलाईनच्या व काँक्रीटीकरण कामाचा आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ


प्रभाग क्रमांक ९ मधील लक्ष्मी नगर, संतपेठ येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटकरण व कुंभार गल्लीयेथील पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन टाकण्याच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, पाणीपुरवठा समिती सभापती सुप्रिया डांगे, नगरसेवक वामनतात्या बंदपट्टे, या प्रभागाच्या नगरसेविका लतिका डोके, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.  
यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, संतपेठ भागात व विशेषत: लक्ष्मी नगर झोपडपट्टी येथील रस्ता कॉंक्रीटीकरण करावा व कुंभार गल्ली या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या गेली  अनेक वर्षे होती व सदर नागरिकांनी या ठिकाणी पाईपलाईन टाकुन मिळावी अशी मागणी या प्रभागाचे नगरसेवक लतिका डोके यांनी माझ्याकडे केली होती. त्याची दखल घेवुन मी सदरचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा म्हणुन नगराध्यक्ष व नगरसेवक यांना सुचना दिल्या होत्या. त्यास अनुसरुन आज या भागात कॉंक्रीटीकरण व नविन पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ करण्यात येत असल्याचे सांगितले. यावळी बोलताना शहरातील विविध विकास कामाबाबत अभ्यासपुर्ण माहिती दिली. तसेच शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असुन संतपेठ भागाच्या विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडु देणार नाही असे सांगितले.
या कार्यक्रमावेळी नगरसेवक संजय निंबाळकर, सुजितकुमार सर्वगोड, विवेक परदेशी, बांधकाम सभापती मालन देवमारे, नगरसेवकिा रेणुका घोडके, सचिन डांगे, नरसिंह शिंगण, अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, मालोजी शेंबडे, कमल देवमारे, रामभाऊ माळी, तम्मा घोडके, सदर कार्यक्रमाचे नियोजन अमोल डोके मित्र मंडळ व क्रांतिसुर्य फाऊंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते. तसेच  संतपेठ भागातील नागरिक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव