पंढरी वार्ता :- खाजगी दूध संकलन केंद्रावरील धाडीत १०० किलो भेसळयुक्त दूध पावडर जप्त

खाजगी दूध संकलन केंद्रावरील धाडीत १०० किलो भेसळयुक्त दूध पावडर जप्त   
जिल्हा अन्न प्रशासनाची कारवाई
जिल्हा अन्न प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सांगोला तालुक्यातील मानेगाव येथील जालिंदर अर्जुन बाबर याच्या दूध संकलन केंद्रावर टाकलेल्या धाडीत  १०० किलो Skimmed Milk Powder (किंमत सुमारे 36०००/-) हा भेसळकारी पदार्थ आढळून आला. सदर ठिकाणी दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित भेसळीचा संशय असलेले व योग्य तापमानास न साठविलेले दूध (१९८ लिटर) किंमत सुमारे रु.3960/- जप्त करण्यात आला व भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट करण्यात आला.व  एकूण रु. 39960/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

सदर आस्थापणेस दूध संकलन बंद करणेबाबत निर्देश देण्यात आले असून आस्थापणेचा परवाना रद्द करणेबाबत पदानिर्देशित अधिकारी यांना सादर करण्यात येईल.
सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अन्न सुरक्षा अधिकारी श्री. मंगेश लवटे यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. योगेश देशमुख व श्री. उमेश भुसे यांच्या सहकार्याने पार पाडली.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव