पंढरी वार्ता :- मराठा समाजाचा अंत पाहू नका ! जि. प. सदस्य शैला गोडसे यांचा इशारा
मराठा समाजाचा अंत पाहू नका !
जि. प. सदस्या शैला गोडसे यांचा इशारा
कुरूल जि.प.गट मतदार संघातील इंचगाव ता.मोहोळ येथे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मराठा समाजाच्या मागण्याचे निवेदन कामती पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. उंदरे यांना सर्व ग्रांमस्थाच्या वतीने देण्यात आले.
*मराठा समाजाने मुंबई येथे काढलेल्या 58 व्या मुक मोर्चावेळी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील 50% सवलतीची अंमलबाजवणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठ्यांसाठी घोषित केलेल्या 16% आरक्षणाचा अध्यादेश काढून त्यांचे त्वरित कायद्यात रूपांतरण करावे, अण्णासाहेब पाटील महामंडळ योजने अंतर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत आणि कै. काकासाहेब शिंदे यांना त्वरित आर्थिक मदत देवून हुतात्मा घोषित करावे, या मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शासनाकडे वारंवार करण्यात येत आहेत.सर्व महाराष्ट्रात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे .तरी सुद्धा शासनास व सरकारला जाग येत नाही.शासन झोपेचे सोंग घेत आहे.त्वरीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा मराठा समाज आपली जागा दाखविण्यास वेळ लावणार नाही.यावेळी इंचगाव येथील संरपच उपसंरपच व ग्रामस्थ व युवक वर्ग विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


