पंढरी वार्ता:- मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तो पर्यंत दंडावर काळी फीत बांधून शासनाचा निषेध ! आज 16 ऑगस्ट पासून आंदोलनास गादेगाव येथून सुरुवात

 मराठा समाजास आरक्षण मिळत नाही तो पर्यंत दंडावर काळी फीत बांधून शासनाचा निषेध ! 
आज 16 ऑगस्ट पासून आंदोलनास गादेगाव येथून सुरुवात
    
(पहा गादेगाव येथे आंदोनकर्त्यानी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया )
 


9 ऑगस्ट 2016 ला सूरु झालेला मराठा मोर्चाच्या  दोन वर्षाच्या शांततामय आंदोलनानंतरही या सरकारचे डोळे उघडत नसल्याने  हा मुक मोर्चा ठोक मोर्चात परावर्तीत झाला.या दोन वर्षात फडणवीस सरकारने हा लढा मोडुन काढण्यासाठी बरेच मार्ग वापरुन पाहिले. पहिल्यांदा इतर समाजाला मराठा मोर्चाच्या विषयी गैरसमज पसरवून प्रती मोर्चे काढायला प्रवृत्त केलं. नंतर आंदोलनात फुट पाडण्यासाठी मोर्चांना जातीय रंग देणे, काही कळसुत्री नेत्यांना आंदोलनात घुसविणे, अशा नेत्यांनी सरकारशी चर्चा केल्याचे वृत्त पसरविणे, समान नागरी कायदा, आर्थिक निकष अशा कधीच अस्तित्वात न येणार्या मुद्यावर आणुन आंदोलकांचे लक्ष भरकटवणे असे अनेक प्रयत्न करुन ही आंदोलनातील एकसंधपणा कमी होत नाही हे लक्षात आल्यावर हे सरकार शेवटी पोलीस बळाचा व कायद्याचा धाक दाखविण्याची खेळी खेळत मराठा समाजाचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करु लागले.मात्र आता मराठा समाज बांधवांनी शासनास शह देण्यासाठी संवैधानिक मार्गाने आपला आंदोलन सुुर ठेवण्याचा निर्णय घेतला असून याचाच एक भाग म्हणून 16 ऑगस्ट पासून मराठा समाजाच्या आरक्षण लढयातील प्रत्येक आंदोलक आपल्या डाव्या दंडास काळी फीत लावून आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत शासनाचा निषेध करत राहणार आहे अशी घोषणा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.पंढरपूर तालुक्यात या आंदोलनास आज गादेगाव येथून सुरुवात करण्यात आली आहे.
               या बाबत सकल मराठा समाजाच्या वतीने दिलेल्या माहीती नुसार मुख्यमंत्री, महसुल मंत्री या सारख्या जबाबदार पदावरील व्यक्तींनी गेल्या 15-20 दिवसात केलेली विधाने पाहता सनदशीर मार्गाने चालणारे मराठा आंदोलन आपला मार्ग सोडुन हिंसक हाच हेतू सरकारमधील काही लोकांचा आहे.9 ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात काही समाजकंटकाना घुसवून त्यांच्या करवी जाळपोळ, दगडफेक अशी कृत्ये घडवून आणून मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करण्याचा डाव टाकला गेला व तो काही अंशी यशस्वी झाल्याचे दिसुन ही आले. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी आंदोलन आपल्या आचारसंहितेपासुन, मुळ स्वरुपापासुन भरकटले आहे हा विचार करुन रस्त्यावरील आंदोलने बंद केली. न्याय प्रविष्ठ कारण दाखवत सरकार ही या आंदोलनातील हवा काढुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे.आता आपण आरक्षण लढा अंतीम टप्प्यात आला आहे.अशावेळी  हा लढा संघटीतपणे पुढे न्यावा लागणार आहे.आरक्षणाची लढाई सुरु ठेवतानाच शासकिय वा खाजगी मालमत्तेच नुकसान होऊ नये ही काळजी घेत  दि. 16 ऑगस्ट 2018 पासुन जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व मराठा बंधु भगिनीनी  आपल्या डाव्या दंडावर काळी रिबीन बांधून शासनाचा निषेध करीत रहावा असे आवाहन करण्यात आले आहे. ही रिबीन आपल्या ध्येयाची  आठवण करुन देत राहील. शिवाय ही रिबीन पाहुन समाजामध्ये मराठा आरक्षणाची चर्चा होत राहील. त्यामुळे काही दिवसाने या लढ्याची तिव्रता कमी होईल व नेहमीप्रमाणे या प्रश्नाचं घोंगडं ही भिजत ठेवता येईल या सरकारच्या मानसिकतेला ही चोख उत्तर ठरणार आहे. 16 ऑगस्टपासुन प्रत्येक मराठा बंधु भगीनीने आपल्या डाव्या दंडावर अथवा खिशावर दररोज काळी रिबीन बांधण्यास सुरुवात करावी व इतरांना ही बांधण्यास प्रोत्साहित करावे. हे रिबीन बांधणे आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत सुरु राहिल यात सर्व समाजबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव