पंढरी वार्ता :- 3 टक्के अपंग विकास निधी तातडीने ग्रामपंचायतींना वर्ग करा अन्यथा 23 ऑगस्ट पासून उपोषण

3 टक्के अपंग विकास  निधी तातडीने ग्रामपंचायतींना वर्ग करा अन्यथा 23 ऑगस्ट पासून उपोषण
प्रहार संघटनेचा पंचायत समिती गट विकास अधिकार्‍यांना निवेदनाद्वारे इशारा 
अपंग व्यक्तींना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील 3 टक्के निधी देण्याची तरतूद आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अपंगांना न्याय मिळतच नाही. अपंग व्यक्ती कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 3 टक्के निधीतून अपंग कल्याणकारी योजना राबवून अपंगांचे पुनर्वसन करण्यात येते. हा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना खर्च करणे बंधनकारक असते. मात्र, सर्वच ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा हा निधी खर्च करण्यास टाळाटाळ करतात तर अनेक वेळा ग्रामपंचायतींना हा निधीच उपलब्ध करुन दिला जात नाही.या निधी पासून वंचीत राहीलेल्या ग्रामपंचायतींना तातडीने हा निधी उपलब्ध करुन द्यावा अन्यथा 23 ऑगस्ट पासून आ.बच्चू कडू यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली  पंचायत सतिमीसमोर उपोषण केले जाईल असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.हे निवेदन देताना प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश लामकाने, संजय जगताप , गणेश  ननवरे, दत्ता  चौगुले,  सुरेश  दबडे  श्री जगताप आदी उपस्थित होते.  
      जिल्हा परिषदांनी अंदाजपत्रकातील 3 टक्के निधी पंचायतर समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अपंग कल्याणासाठी खर्च करण्याचे सरकारचे निर्देश आहेत, पण हे आदेश धाब्यावर बसवून  मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत अपंगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यास टाळाटाळ केली आहे.त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक अपंग व्यक्ती त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.अपंग कायदा 1995 च्या कलम 40 नुसार चालू आर्थिक वर्षात अपंगांच्या हक्काचा तीन टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.मात्र त्याची अंमल बजावणी होत नाही.त्यामुळे प्रहार संघटनेस आता उपोषणा शिवाय पर्याय उरला नसल्याची माहीती प्रहार संघटेनचे तालुकाध्यक्ष गणेश लामकाने यांनी दिली आहे.   

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव