सकल धनगर समाज आता निर्णायक आंदोलनाच्या तयारीत
सकल धनगर समाज आता निर्णायक आंदोलनाच्या तयारीत
गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज आपल्या हक्काच्या अनुसुचीत जमतीच्या आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आला आहे.महाराष्ट्रात धनगड जमात दाखवा असा निर्वाणीचा इशारा देत धनगर समाजाने 7 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले तर अनेक ठिकाणी मोर्चही काढण्यात आले.धनगर समाजातील युवकांनी या आरक्षणाच्या लढाईत आत्महत्या करुन हौतात्म्य पत्करले तरीही शासनास पाझर फुटला नाही.13 ऑगस्ट रोजी धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी बंदची हाक दिली होती.मात्र राज्यातील भिषण परिस्थीती लक्षात घेवून धनगर समाजाने मन मोठे करुन हा बंद मागे घेतला.असे असताना शासन धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आता धनगर समाज निर्णायक आंदोलनाच्या तयारीत असून 31 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येतील हमखास मैदानावर धनगर समाज राज्यभरातून एकवटणार असून हा धनगर समाजाचा शासनास निर्वाणीचा इशारा आहे अशी भुमिका सकल धनगर समाज बांधवांनी आज येथील शासकिय विश्रामगृह येथे आयोजीत बैठकीत व्यक्त केली आहे.
या बैठकीस सकल धनगर समाजातील अनेक ज्येष्ठ व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.31 ऑगस्ट ही धनगर समाजाने राज्य शासनास दिलेली अंतिम डेडलाईन असून यानंतर सकल धनगर समाजाच्या वतीने जे राज्यव्यापी उग्र आंदोलन केले जाईल त्याची संपुर्ण जबाबदारी राज्य शासनाची असणार आहे असाही इशारा या बैठकीत देण्यात आला.
या बाबत अधिक माहीती जाणून घेण्यासाठी सकल धनगर समाज आरक्षण आंदोलनाचे समन्वयक प्रा.सुभाष मस्के यांच्याशी संपर्क केला असता पंढरी वार्ताशी बोलताना म्हणाले की,नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर गोवारी समाजाने प्रचंड मोर्चा काढला होता.या मोर्चावर तत्कालीन शासनाने गोळीबारासारखी निष्ठूर कारवाई केली होती.मात्र हा समाज मागे हटला नाही.आज आमच्य धनगर समाजाचीही हीच मानसिकता असून हे सरकार जर आमचा बळी घेवून आरक्षण देणार असेल तर आमचा समाज बळी जाण्यासही सज्ज आहे.पण आता हा लढा निर्णायक पातळीवर असून आम्ही आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही.31 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील आंदोलनासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातून हजारो समाज बांधव औरंगाबाद येथे जाणार आहेत.यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे यासाठी सकल धनगर समाज 20 ते 24 ऑगस्ट या कालावधीत संपुर्ण पंढरपूर तालुका पिंजून काढणार असल्याचे या आंदोलनाचे समन्वयक प्रा.सुभाष मस्के यांनी पंढरी वार्ताशी बोलताना सांगीतले.
31 ऑगस्टला औरंगाबाद येथे धनगर समाजाचा एल्गार
पंढरपूर शहर व तालुक्यातून हजारो समाज बांधव सहभागी होणारगेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज आपल्या हक्काच्या अनुसुचीत जमतीच्या आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आला आहे.महाराष्ट्रात धनगड जमात दाखवा असा निर्वाणीचा इशारा देत धनगर समाजाने 7 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन केले तर अनेक ठिकाणी मोर्चही काढण्यात आले.धनगर समाजातील युवकांनी या आरक्षणाच्या लढाईत आत्महत्या करुन हौतात्म्य पत्करले तरीही शासनास पाझर फुटला नाही.13 ऑगस्ट रोजी धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी बंदची हाक दिली होती.मात्र राज्यातील भिषण परिस्थीती लक्षात घेवून धनगर समाजाने मन मोठे करुन हा बंद मागे घेतला.असे असताना शासन धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आता धनगर समाज निर्णायक आंदोलनाच्या तयारीत असून 31 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येतील हमखास मैदानावर धनगर समाज राज्यभरातून एकवटणार असून हा धनगर समाजाचा शासनास निर्वाणीचा इशारा आहे अशी भुमिका सकल धनगर समाज बांधवांनी आज येथील शासकिय विश्रामगृह येथे आयोजीत बैठकीत व्यक्त केली आहे.
या बैठकीस सकल धनगर समाजातील अनेक ज्येष्ठ व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.31 ऑगस्ट ही धनगर समाजाने राज्य शासनास दिलेली अंतिम डेडलाईन असून यानंतर सकल धनगर समाजाच्या वतीने जे राज्यव्यापी उग्र आंदोलन केले जाईल त्याची संपुर्ण जबाबदारी राज्य शासनाची असणार आहे असाही इशारा या बैठकीत देण्यात आला.
गोवारी समाजाप्रमाणे आम्ही गोळ्या खाण्यास तयार पण आरक्षणाचा निर्णय घेण्यास शासनास भाग पाडू - प्रा.सुभाष मस्के