पंढरी वार्ता :- पंढरपुर फोटोग्राफर विकास मंचने फोटोग्राफर बांधवांना संघटित केले- जेष्ठ फोटोग्राफर शिवाजीराव तरळगट्टी

पंढरपुर फोटोग्राफर विकास मंचने फोटोग्राफर बांधवांना संघटित केले- जेष्ठ फोटोग्राफर शिवाजीराव तरळगट्टी


पंढरपूर फोटो ग्राफर विकास मंचने फोटोग्राफर बांधवांना संघटीत करुन त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी जो संघटीत प्रयत्न चालविला आहे,व या विकास मंचच्या माध्यमातून नवनव्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत त्या निश्‍चितच कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन जेष्ठ फोटोग्राफर शिवाजीराव तरळगट्टी यांनी केले पंढरपूर मध्ये फोटोग्राफर दिनानिमित्त पंढरपूर विकास मंच च्या वतीने शहर व तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांच्या विशेष कार्यशाळेचे येथील हॉटेल विठ्ठल इन मध्ये आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते.यावेळी फोटोग्राफर शिवाजी दादा तरळगट्टी, लालाकाका खिस्ते,सांगली कलर लॅबचे मालक शरद सारडा व श्रीकांत बाहेती यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
             या कार्यशाळेत पंढरपूर शहर व तालुक्यातील फोटोग्राफर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या कार्यशाळेत फोटो इडिटींग सॉफ्टवेअर विषयीे अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.तसेच नवनवीन अत्यधुनिक कॅमेरे,लेन्सेस,अल्बम,फ्लॅश,आदि साहित्यांसह प्रत्यक्षिक दाखविण्यात आले.
   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत(बंटी)लव्हेकर,विनायक देवकर,बशीर शेख,बापू कदम,अरविंद होवाळ श्रीराम बडवे,संजय गुरव,राजू आंबिके,नागेश साळुखे,हरि सर्वदे,प्रवीण पुकाळे,कबीर देवकुळे,सचिन कुलकर्णी,नितीन घोडके,भगवान नाईकनवरे,उमेश झाडे आदिंनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव