पंढरी वार्ता :- राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या बुथ सक्षमीकरण संकल्प मेळाव्यास हजारो युवकांची उपस्थिती
राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या बुथ सक्षमीकरण संकल्प मेळाव्यास हजारो युवकांची उपस्थिती
भर पावसात कार्यकर्त्यांच्या उत्साह पाहून प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी केले कौतुक
दिवसभर पावसाची रिपरिप असतानाही सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने पंढरीत आयोजीत करण्यात आलेल्या बुथ सक्षमीकरण संकल्प मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांनी उत्साहाने उपस्थित राहून बुथ सक्षमीकरणाचा संकल्प सोडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी उत्साही कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आ.दिपक साळुंखे-पाटील,आ.दिलीप सोपल,मा.आ.राजन पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे,युवकचे जिल्हा निरिक्षक प्रदिप कंद,जि.प.सदस्य उमेश पाटील,अजित जगताप,आर्यन सोपल,आप्पासो कोरे,राजेंद्र हजारे,लतीफ तांबोळी,प्रकाश चवरे,बाळासो केदार,महिला जिल्हाध्यक्ष मंदा काळे,मंगला शेळवणे,नगमा शेख,प्रविण खवतोडे,अनिता पवार,रंजना हजारे आदींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या बाबत अधिक माहीती देताना राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत माने म्हणाले की,राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉग्रेसने बुथ सक्षमीकरणाचा संकल्प सोडला आहे.सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना या बाबत मार्गदर्शन करण्याच्या हेतूने हा मेळावा आयोजीत करण्यात आला होता.राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ध्येय धोरणाचा प्रसार करण्याच्या हेतूने व प्रत्येक बुथ बळकट करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठोस प्रयत्न केले पाहीजेत असे आवाहन या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आले.बुथ सक्षमीकरणाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रांत माने यांनी केले.
या मेळाव्यात बोलताना आ.दिलीप सोपल यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षातील सारे गटतट बाजूला सारत एकीकरणाचे महत्व पटवून दिले.तर जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील म्हणाले की,युवकांना या राज्यसरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी सक्षम रहावे,जिल्हा कार्याध्यक्ष व ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाच्या माध्यमातून आपल्या गावाचा,परिसराचा विकास करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.मा.आ.राजन पाटील यांनी युवकांची ताकत काय असते हे मोहोळ शहरात 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी युवकांनी 6 हजाराचे मताधिक्क्य देवून दाखवून दिले आहे.जि.प.सदस्य उमेश पाटील म्हणाले की,युवकांचा अवाज वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कायम कटीबध्द असल्याची ग्वाही दिली व युवकांबरोबर सदैव राहून जनतेच्या विविध प्रश्नावर रस्त्यावर उतरण्यास आपण सज्ज असल्याचे सांगीतले.यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या सर्व पदाधिकार्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रामाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी केले.तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष संदीप गाजरे यांनी केले.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भास्कर जगताप,प्रशांत घोडके,श्रीकांत शिंदे,गुरु अभंगराव,निलेश कोरके,अवधुत गायकवाड,प्रफुल्ल घाडगे,संगमेश्वर बगले,महावीर ठेंगील,अविनाश मोरे,गणेश पाटील,संजय पाटील,शंकर पाटील,काका शिंदे,अभिषेक आव्हाड,प्रदिप पाटील,सुरज ढमढेरे,पांडुरंग नविगीरे,सचिन लोंढे पाटील,संदीप घुले,अविनाश मोरे,अनिल सप्ताळ,मनोज आदलींगे,सागर कदम,सुमित शिंदे,अनिकेत घुले यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
