पंढरी वार्ता :- प्रदिप थोरात,नागेश जाधव,मुन्ना जाधव यांच्या पैकी किमान एकास स्विकृत नगरसेवकपदाची संधी द्या !
प्रदिप थोरात,नागेश जाधव,मुन्ना जाधव यांच्या पैकी किमान एकास स्विकृत नगरसेवकपदाची संधी द्या !
गोविंदपुरा परिसरातील परिचारक समर्थकांच्या बैठकीत मागणी
गोविंदपूरा परिसर हा प्रत्येक निवडणुकीत परिचारकांचा बालेकिल्ला राहीलेला आहे.विधानसभा निवडणूक असो अथवा नगर पालीका निवडणूक प्रत्येकवेळी परिचारक देतील तो उमेदवार स्विकारुन तो बहुमताने निवडून आणायची जबाबदारी येथील कार्यकर्त्यांनी मोठया परिश्रमपुर्वक पार पाडली आहे.मात्र नगर पालीका निवडणुकीत येथील प्रभाग अनेकवेळा खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध असतानाही संधी मिळाली नाही.निदान आता स्विकृत नगरसेवक पदासाठी या परिसरातील खंदे परिचारक समर्थक प्रदिप थोरात,नागेश जाधव,मुन्ना जाधव यांना संधी द्यावी अशी मागणी करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
या परिसरातील विरधे बिल्डींग येथे गोविंदपूरा परिसरातील परिचारक समर्थकांची बैठक पार पडली.या बैठकीत समर्थकांनी वरीलप्रमणो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.गोविंदपुरा,खिस्ते गल्ली,बाराभाई तालीम परिसर,दिंडीरवन परिसरातील कार्यकर्ते या बैठकीस मोठया संख्येने उपस्थित होते.या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार लकवरच एक शिष्टमंडळ आ.प्रशांत परिचारक व पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांना भेटणार असून प्रदिप थोरात,नागेश जाधव व मुन्ना जाधव यांच्यापैकी एकास स्विकृत नगरसेवकपदाची संधी द्यावी अशी मागणी करणार असल्याचे समजते.
या बैठकीस उमेश विरधे,माऊली बोराटे,आण्णासाहेब शिंदे,शामराव आदमिले,शंकर थोरात,शंकर लोंढे,विठ्ठल चवरे महाराज,अमर आदमिले,प्रमोद देशपांडे,सिध्दिविनायक विरधे,विनोद आदमिले,नारायण फटे,विजय लकडे,सोमनाथ कोळी,संजय बारस्कर,संदिप थोरात यांच्यासह परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीस उमेश विरधे,माऊली बोराटे,आण्णासाहेब शिंदे,शामराव आदमिले,शंकर थोरात,शंकर लोंढे,विठ्ठल चवरे महाराज,अमर आदमिले,प्रमोद देशपांडे,सिध्दिविनायक विरधे,विनोद आदमिले,नारायण फटे,विजय लकडे,सोमनाथ कोळी,संजय बारस्कर,संदिप थोरात यांच्यासह परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
