पंढरी वार्ता :- दोन समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा-. सचिन साठे
दोन समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा-. सचिन साठे
थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या विटबंनाची बातमी कळाल्या नतंर अण्णा भाऊ साठे यांचे नातु सचिनभाऊ कांबळे हे पंढरपुर मध्ये घटना स्थळला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी कार्यकत्यांशी व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सचिन भाऊ म्हाणाले... अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झाली याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अशा घटनांमध्ये ठरावीक समकंटकांमुळे संपुर्ण समाजाला दोषी ठरवता येणार नाही, दंगेखोर किंवा समाजविघातक कृत्य करणाय्रां समाजकंटाकांवर योग्य ती कारवाई करुन, तात्काळ उर्वरीत आरोपिंना अटक करावी अन्यता राज्यभर आंदोलन उभ करण्याच इशारा दिला.
गेल्या चार वर्षात महापुराषंच्या विटबंना, जातीय दंगली, जाति जाति मध्ये तेढ, या घटनांमध्ये वाढ झाली असुन सरकार जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहे.
तसेच काही मनुवादी विचारधारेचे लोक चुकिचा इतिहास सांगुन समाजाची दिशाभुल करत आहेत. महात्मा फुलें च्या कार्याला कायम सोबत देऊन क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी अस्पृश्यांच्या मुलांच्या शारीरीक आणि शैक्षणिक विकासाठी अहोरात्र काम केले आहे. हे करत आसताना तात्कालिन मनुवादी विचाराच्या लोकांचा विरोध मोडुन काढला.परंतु दुर्देवान हा ईतिहास समोर आणला जात नाही, थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांनी "जग बदल घालुनी घाव सांगुन गेले मज भिमराव" हा संदेश समाजाच्या तरुणांना दिला आहे. तरुणांनी कुठलेही आंदोलन असो हे लोकशाही पद्धतिने आणि शांततेच्या मार्गाने करावे आसे अवाहन केले. परीवर्तनाच्या चळवळीत काम करताना लहुजी वस्तात साळवे, फुले,शाहु,आंबेडकर , अण्णा भाऊ साठे यांचा पुरोगामी विचार समाजापुढे आणुन राज्यभर समाजप्रबोधन करणार आहे आसे सचिनभाऊ साठे म्हणाले. यावेळी दलित मित्र नानासाहेब वाघमारे दिलिपरावजी देवकुळे नागेशभाऊ यादव आंबादास वायदंडे श्रीकांत कसबे श्रीमंत मस्के सोनबा वाघमारे,संजय अडगळे संतोष सर्वगोड डाँक्टर डाॅ संजय लोखंडे नारायण देवकुळे महादेव वाघमारे, राजु देवकुळे किशोर खिलारे, किर्तीपाल सर्वगोड,प्रदिप रणदिवे,कृष्णा वाघमारे, अमित अवघडे शैलेश आगावणे अणिल मस्के सुधिर रणदिवे तुषार खंदारे आदी उपस्थित होते.
10.67 GB (71%) of 15 GB used
Last account activity: 4 hours ago
Details |
|
|
