पंढरी वार्ता :- केरळ पूरग्रस्तांना पंढरपूर शहर ओबीसी काँग्रेस कडून आर्थिक मदत

 केरळ पूरग्रस्तांना पंढरपूर शहर ओबीसी काँग्रेस कडून आर्थिक मदत 



केरळमध्ये पाऊस व महापुराने थैमान घातलेले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झालेली आहे. अशा संकटातील केरळच्या बांधवांना जात, धर्म, पंथ व पक्ष भेद न मानता अल्पशी मदत म्हणून पंढरपूर शहर ओबीसी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून 4 हजार रूपयांची मदत देण्यात आलेली आहे. याचा डी.डी. पंढरपूर तहसिल कार्यालयातील जेलर शिंदे यांच्याकडे ओबीसी कॉंग्रेस पंढरपूर शहराध्यक्ष मधुकर फलटणकर व प्रदेश सचिव प्रा.अशोक डोळ यांच्याहस्ते देण्यात आला. सध्या केरळ येथील बांधवांना देशातून व परदेशातून मदत देण्यात येत आहे. याचा विचार करून पंढरपूर शहर ओबीसी कॉंग्रेस ही मागे न राहता ती केवळ राजकारण न करता समाज कार्यात देखील अग्रेसर असते. याचाच एक भाग म्हणून केरळमधील पुरग्रस्त बांधवांना अल्पशी मदत दिलेली आहे.
कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे साहेब, तालुकाध्यक्ष प्रकाशतात्या पाटील, महिला प्रदेश सचिव सुनेत्राताई पवार, ओबीसी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी मोरे, जिल्हाध्यक्ष समीर कोळी व कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर ओबीसी कॉंग्रेसच्यावतीने असेच सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांनी सांगितले.
यावेळी निंबाळकर भाऊजी, शशिकांत देशमाने, शैलेश देशमाने, ओबीसी कॉंग्रेस उपाध्यक्ष बालाजी देशमाने, विजय मेटकरी, अर्जुन कांबळे, सुनिल भोसले, दत्ता कांबळे, पिंटू महागावकर, गोट्या आदमिले, प्रशांत महागावकर, गणेश भोसले, कुमार माने यांच्यासह ओबीसी कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव