पंढरी वार्ता :-निष्ठेचे फळ आणि कार्यकर्त्याच्या पाठबळामुळे शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड - संभाजी शिंदे

निष्ठेचे फळ आणि कार्यकर्त्याच्या पाठबळामुळे शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड 
- संभाजी शिंदे 
संभाजी शिंदे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण 


पं.स. सदस्य तथा विद्यमान शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख संभाजी शिंदे यांची सोलापूर जिल्हाप्रमुखपदी (पंढरपूर विभाग) निवड घोषित करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.24) रोजी दुपारी मुंबई येथील मातोश्री निवास या ठिकाणी शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी निवड जाहीर केली आहे. 
या निवडीप्रसंगी संभाजी शिंदे यांचा सत्कारही पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यानिवडीप्रसंगी शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत, नूतन सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, सहसंपर्कप्रमुख तथा भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख  (सोलापूर विभाग) गणेश वानकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  या निवडीचे वृत्त समजल्यानंतर भाळवणी गावात फटाक्याची आताषबाजी करण्यात आली. 
संभाजी शिंदे हे  शिवसेनेचे  एकनिष्ठ कार्यकर्ते असून गेली 25 वर्षे निष्ठेने शिवसेना पक्षाची धुरा खांद्यावर घेवून कार्य करित आहेत. त्यामुळे त्यांना कार्यक्षमता आणि पक्षनिष्ठेचे फळ मिळाले असून गेल्या 15 वर्षापासून शिवसेना तालुका प्रमुख काम करित आहेत. तसेच भाळवणी गटातून ते विद्यमान पं.स. समिती सदस्य असून यापूर्वीही ते दोन वेळा पं.सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. 
विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती सदस्यपदी निवड झाल्यानंतर त्यांनी चांगल्या निर्णयात पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष ना. दिवाकर रावते यांनीही शिंदे यांच्या कामाची दखल घेवून महाराष्ट्र राज्य कामगार सेना पंढरपूर आगार अध्यक्षपदीही निवड केली आहे. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव