पंढरी वार्ता :- विश्वक्रांती सामाजिक मालवाहतूक संघटनेच्या शाखेचे वेळापूर येथे उद्घाटन संपन्न
विश्वक्रांती सामाजिक मालवाहतूक संघटनेच्या शाखेचे वेळापूर येथे उद्घाटन संपन्न
विश्वक्रांती सामाजिक मालवाहतूक संघटनेच्या शाखेचे वेळापूर येथे सौ.विमलताई जानकर, वृषाली पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष दिलीप मलपे, संस्थापक उपाध्यक्ष संदिप शिंदे, सचिव भाऊराव जाधव, जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे, पोलीस हवलदार जावेद जमादार, काका जाधव, पिनू येडगे, शिवराज मंडले, रमेश वाघ यांच्यासह आदि मान्यवर प्रमुख उपस्थितीत होते.
संस्थापक अध्यक्ष दिलीप मलपे म्हणाले की, ड्रायव्हरला अडचण आल्यास एकमेकांना सहकार्य करावे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना लायसन्स काढण्यासाठी कागदपत्रांची अडचण असो आर्थिक अडचण असो ती संघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरज चौधरी, अशोक जाधव, जिल्हा संघटक सुर्यकांत बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष नागनाथ शेंडगे, माळशिरस तालुकाध्यक्ष आप्पा गोरे, उपाध्यक्ष किरण बोडरे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष बापू वाघ, शहराध्यक्ष लक्ष्मण गाजरे, कृष्णा कवडे, तालुकाध्यक्ष लखन धोत्रे, शहर सचिव संदिप शिंदे, तुषार दिक्षीत, पेनूर शाखेचे सचिव सिताराम हेंगडे, संतोष देठे, सुखदेव गाजरे, किरण धोत्रे, शिवराज कवडे, सोमनाथ आरे, त्रिंबक सोनवणे आदि उपस्थित होते.
तसेच वेळापूर शाखेच्या अध्यक्षपदी मैनुद्दीन शेख, उपाध्यक्षपदी नागनाथ गायकवाड, सचिवपदी चंद्रकांत गोफणे, खजिनदारपदी महादेव पवार यांची निवड करण्यात आली.
