पंढरी वार्ता :- बडवे प्रतिष्ठानचा आदर्श माता गौरव सोहळा संपन्न
बडवे प्रतिष्ठानचा आदर्श माता गौरव सोहळा संपन्न
एकत्र कुटुंब पध्दती ही काळाची गरज - साध्वी राधिकामाता सरस्वती
- एकत्र कुटुंब पध्दती ही काळाची गरज आहे.विभक्त कुटुंब पध्दतीमुळे आज अनेक कुुटुंबात असुरक्षीततेची भावना निर्माण झाल्याने मानसिक स्वास्थ हरवत चालले आहे.त्यामुळे कुटुंबाच्या उत्कर्षासाठी आणि पुढील पिढीवर सुसंस्कार करण्यासाठी एकत्र कुटुंब पध्दतीचा आणखी प्रसार झाला पाहीजे व यामुळे देश देखील संघटीत होण्यास मदत होईल असे प्रतिपादन साध्वी राधिकामाता सरस्वती यांनी केले आहे.सौ.पावर्तीबाई बडवे महिला प्रतिष्ठाणच्या वतीने येथील संत तुकाराम भवन येथे कॉग्रेसच्या नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.या कार्यक्रमात उषाताई विश्वनाथ कराड,पुष्ममाला यशवंतराव पाटील,अरुणा गोपाळकृष्ण शहापूरे,मालती मधूकर कवडे या आदर्श मातांचा गौरव करण्यात आला.तर बडवे समाज भुषण म्हणून सुचीत साईनाथ बडवे,विजय वैभव बडवे,श्रीराम दत्तात्रय बडवे यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी प्रतिष्ठाणच्या वतीने गौरी सजावट स्पर्धेतील विजेत्या मंडळाना तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते पारितोषीके देवून गौरव करण्यात आला.
- या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भागवताचार्य वा.ना.उत्पात,नगराध्यक्षा साधनाताई भोसले, ह.भ.प.केशवदास नामदास महाराज, पंढरपूर तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील,बाबासाहेब बडवे,पंढरपूर नगर पालीकेचे प्रशासन अधिकारी सुनिल वाळूजकर,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रतिष्ठाणचे कार्यवाहक नागनाथ अधटराव यांनी केले.या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार सौ.पार्वतीबाई बडवे महिला प्रतिष्ठाणच्या संस्थापिका संध्या द.बडवे व दर्शना बडवे यांच्या हस्ते करण्यात आला.
- या गौरव सोहळ्यामाध्यमातून एकत्र कुटुंब पध्दतीच्या माध्यमातून आदर्श पिढी घडविणार्या मातांचा सत्कार होत असल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून समाधान व्यक्त केले.तर आदर्श मातांच्या वतीने डॉ.सुचित्रा नांगरे व भोसे येथील श्री मस्के सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याच कार्यक्रमात आषाढी यात्रा 2018 कालावधीत आपल्या प्रशासन कौशल्याने योग्य नियोजन केल्याबद्दल नगर पालीकेचे प्रशासन अधिकारी सुनिल वाळूजकर यांचा प्रतिष्ठाणच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा सुरेखा मारुती मोरे यांनी केले. सुत्र संचालन डॉ.प्रतिभा देशपांडे यांनी केले.शेवटी आभार प्रदर्शन सुहास भाळवणकर यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द.बडवे,मिलींद आढवळकर,श्रीपाद बडवे,रेवती गोटेकर,दर्शना बडवे,शहर कॉग्रेसचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे सहकार्य लाभले.

