पंढरी वार्ता :- उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांच्याकडून युवकाच्या उपचारासाठी अर्थिक मदत

 उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांच्याकडून युवकाच्या उपचारासाठी अर्थिक मदत


 युटोपीयन शुगरचे चेअरमन व पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत इतर कार्यक्रमास खर्च करण्याऐवजी उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून पारुबाई महादेव घनवजर मु.पो.सरकोली सध्या रा.इसबावी यांच्या मुलाच्या ऑपरेशन साठी अकरा हजार रुपयेची मदत इसबावी विकास सेवा सोसायटी चेअरमन सुखदेव आप्पा मलपे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली.  

  या बाबत अधिक माहीती देताना अतुल मलपे म्हणाले की,आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक युटोपीयन शुगरचे चेअरमन  व  पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेशराव परिचारक यांचा वाढदिवस प्रतिवर्षी आम्ही विविध विधायक उपक्रमाचे आयोजन करुन साजरा करत असू मात्र यावर्षी हा सर्व खर्च टाळून सदर मुलाच्या ऑपरेशनसाठी मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आणि हा निधी सुपुर्द केला आहे.
यावेळी  समाधान मलपे , अतुल मलपे विनायक गाजरे रोहित मलपे  प्रशांत काळे मनोज कांबळे  उपस्थित होते

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव