पंढरी वार्ता :- फोटोग्राफर विकास मंचने ‘शिवबाबा’ला दिली जगण्याची नवी उमेद

 फोटोग्राफर विकास मंचने ‘शिवबाबा’ला दिली जगण्याची नवी उमेद 
 फोटोग्राफर दिनानिमित्त D40 hm DSLR “ कॅमेरा भेट देवून केला हृद सत्कार 



19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त पंढरपूर विकास मंचच्या वतीने फोटोग्राफर म्हणून  45 वर्षे  या क्षेत्रात कार्यरत राहीलेल्या परंतू आता परिस्थीतीचे चटके खात जगण्याची दिशाच हरवून बसलेल्या शेवते येथील राजू स्वामी उर्फ  शिवबाबा यांचा फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने  D40 hm DSLR  कॅमेरा, मानाचा फेटा व संपूर्ण कपडयाचा आहेर देऊन हृद सत्कार करण्यात आला.यावेळी परिस्थीतीचे चटके खात जगण्याची उमेद व दिशा हरवून बसलेल्या शिवबाबाच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वहात होत्या.माझ्या व्यवसायबंधूनी मला परत नवसंजिवनी दिली त्यांचा मी शतश: आभारीआहे अशी भावपुर्ण प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली.यावेळी उपस्थित मंचच्या सदस्यांचेही डोळे पाणावले होते.       
संघटना ज्या वेळी निर्माण होते त्या वेळेला त्या संघटनेचा मुख्य हेतु हा असतो की आपल्या संघटनेच्या निगडित असलेल्या कोणत्याही व्यक्तिवर जर कोणते संकट आले अन्याय झाला तर आपन त्याच्या मदतीला धाऊन गेले पाहिजेङ्गहा उद्देश् डोळ्या समोर ठेऊन पंढरपुर फ़ोटोग्राफर विकास मंच ने उचलले एक पाऊल शिवबाबांचे मूळ गाव शेवते ता.पंढरपुर शिवबाबा म्हणजे ग्रामीण भागावर ज्यांच्या फोटोग्राफी ने राज्य केले असे फोटोग्राफर.शिवबाबा म्हणजे कायम हसरा चेहरा फोटोग्राफीवर जीवापाड प्रेम करणारा अवलिया कलाकार.म्हणूनच की काय एका कार्यक्रमात श्रीपुर येथील उद्योजक श्री आगाशे यांनी  स्टेजवर बोलाऊन शिवबाबांचे कौतुक केले होते.जिल्ह्यातील बर्‍याच नेत्यांना फोटोग्राफीच्या माध्यमातून झळकवण्याचे काम शिवबाबांनी केले. जवळपास 40 ते 45 वर्ष झाली ते फोटोग्राफी करीत होते व आपल्या संसारात सुखी होते पण ह्या संसाराला कुणाची नजर लागली माहीत नाही आणि जस चिमन्यांच घरट कोसळत् तस शिवबाबाच घर कोसळल आणि शिवबाबा निराधार झाले.एकीकडे वयाची साठी गाठली आणि आधार पण कुणाचा नाही.शिवबाबाची अवस्था दयनीय झाली होती उत्पनाचे पण कोणतेच साधन जवळ नव्हते.आणि मग त्यांनी एक पर्याय निवडला की लोकांकडून मदत म्हणून पैसे मागुन जीवन व्यतीत  करायचे. यातही आपला कुणाला त्रास वाटू नये म्हणून एखाद्या व्यक्तिला 30 रूपये 1 तारखेला मागितले की परत त्याच्या कड़े पैसे मागायला पंधरा दिवसांनीच जायचे म्हणजे त्याला पण द्यायला त्रास होणार नाही.  गेली तीन वर्ष शिवबाबा याच पध्दतीने परिस्थीतीला सामोरे जात होते.विकास मंचचे बशीर शेख यांनी शिवबाबा यांची संपुर्ण हकीकत जाणून घेतली आणि मंचच्या सदस्यांशी चर्चा केली व शिवबाबाला  सन्मानाने जगता यावे यासाठी आज जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त येथील जिजामाता उद्यान येथे आयोजीत कार्यक्रमात शिवबाबाचा हार्दिक सत्कार करुन कॅमेरा भेट दिला.
 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास मंचचे बंटी लव्हेकर,विनायक देवकर,बशीर शेख,श्रीराम बडवे,सतीश चव्हाण,बापू कदम,नागेश साळुंखे,प्रवीण पुकाळे,कबीर देवकुळे,भगवान् नाईकनवरे,मोहन काळे,किशोर काकड़े,नवनाथ खिलारे,सचिन कुलकर्णी,पांडुरंग कुलकर्णी व तालुक्यातील सर्व फोटोग्राफर बांधव  उपस्थित होते

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव