पंढरी वार्ता:- ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाझेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनाझेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
पोलीस कर्मचार्यांनाही जिलेबी भरवून दिल्या शुभेच्छा
ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनच्या वतीने पंढरपूर तालुका अध्यक्ष शफी मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आज 72 वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठया उत्सासात साजरा करण्यात आला.या निमित्ताने आज येथील उर्दू शाळा नं.16 येथील विद्यार्थ्यांना तसेच अरबी मदरसा टाकळी रोड येथे ध्वजवंदनानंतर खाऊ वाटप करण्यात आले तर पंढरपूर पोली उपअधिक्षक कार्यालय, शहर व तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनाही ऑर्गनाझेशनच्या वतीने जिलेबी भरवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
येथील ऊर्द प्रशालेत बोलताना तालुकाध्यक्ष शफी मुलाणी म्हणाले की,ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून सुटका करुन घेण्यासाठी आपल्या देशातील अनेक महान सपूत शहीद झाले आहेत.तेव्हा कुठे आपणास हे स्वातंत्र्य अनुभवता आले आहे.स्वातंत्र्याचा पाया हा समता आणि बंधुता आहे.याच विचारावर आपण आपल्या देशाला आणखी प्रगतीपथावर नेवू शकतो.यावेळी कार्यध्यक्ष सय्यद नाडेवाले,शहराध्यक्ष इम्राण तांबोळी,शहर उपाध्यक्ष हमीद पठाण,जिल्हा उपाध्यक्ष आदमभाई मुजावर,तालुका अध्यक्ष अशपाक भालदार,सदस्य मकसुद कमलीवाले,मुबीन कमलीवाले,अझर कुरेशी,रहीम शेख,समाजसेवक मुज्जमील कमलीवाले,मुद्दसर नाडेवाले,अशपाक तांबोळी,तौफीक शेख,भ्रष्टाचार निर्मुलन विभाग अध्यक्ष करीम मुलाणी यांच्यासह के.एन.आर.ग्रप,ओन्ली रॉयल ग्रुप,ओन्ली के.जी.एन.ग्रुप,कार्यसम्राट फे्रंड सर्कलचे सर्व सदस्य उपस्थित होते.
