पंढरी वार्ता:- पाणी फौंडेशनच्या कार्यास एस.एम.कंन्स्ट्रक्शन कडून अर्थसहाय्य
पाणी फौंडेशनच्या कार्यास एस.एम.कंन्स्ट्रक्शन कडून अर्थसहाय्य
डोंगरगाव पाणी फौंडेशनच्या वतीने समाधान आवताडे यांचा सत्कार
मंगळवेढा तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या वॉटर कप स्पर्धेत डोंगरगाव सह अनेक गावांनी सहभाग नोंदवला होता.या पुरस्कार प्राप्त डोंगरगाव पाणी फौंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध कामांसाठी एस.एम.कंन्स्ट्रक्शनच्या वतीने अर्थसहाय्य दिल्याबद्दल दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांचा डोंगरगावचे सरपंच बाळासाहेब कवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सभापती प्रदिप खांडेकर यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे संचालक राजीव बाबर,शिवाजी जाधव,उत्तम भुसे,मधुकर मोरे,पंडीत साखरे,सारंग जाधव आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
