इसबावी प्रभाग क्रमांक 12  कचरा कुंड मुक्त करणार 

- उपनगराध्यक्ष विशाल मलपे   

  कचरा कुंड मुक्त पंढरपूर साठी पहिले पाऊल 


आमदार प्रशांतराव परिचारक व नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी केलेल्या आवाहना नुसार पंढरपुर शहर हे  कचरा व  कुंडमुक्त  शहर करण्याची सुरुवात म्हणून प्रभाग क्रमांक. 12   कचरा कुंडमुक्त करणार असून येत्या  2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पासूनया प्रभागातील  असणारे सर्व कचरा कुंड काढले जाणार आहेत व या भागातील नागरिकांनी आपला कचरा घंटा गाडी मध्ये  देण्याचे आवाहन या प्रभागाचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांनी केले आहे तसेच पंढरपूर नगरपालिकेने खत निर्मिती प्रकल्प चालू केला असून त्यासाठी ओला व सुका कचरा वेगळा  देण्याची गरज आहे,घरातील  कचरा कचरा कुंडाव्दारे वर्गीकरण होत नसल्यासमुळे ओला कचरा मिळत नसल्याने खत निर्मिती होत नाही व  कचरा कुंडाबाहेर येऊन हा कचरा मोकाट जनावरे रस्त्यावर विस्कटतात त्यामुळे नागरिकांना त्रास होऊन   रोगराई पसरते  त्यामुळे आमदार प्रशांतराव परिचारक व नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी सर्व नगरसेवक यांनी आपला प्रभाग स्वच्छ राहावा व ठेवण्या साठी प्रयत्न करावा आशा सूचना दिल्या होत्या त्या नुसार या कामाची सुरुवात येत्या  2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून प्रभाग क्र 12 पासून सुरवात करण्यात असल्याचे  प्रभागाचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष विशाल मलपे यांनी सांगितले यावेळी मुख्यधिकारी अभिजीत बापट ,पक्षनेते अनिल अभंगराव,गुरुदास अभ्यंकर, सचिन डांगे नागेश भोसले, उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर हे उपस्थित होते अशा प्रकारे शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी कचरा व कुंड मुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांचे मार्गदर्शनाखाली  टप्य्याटप्या ने प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्षा साधना ताई भोसले यांनी सांगितले

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव