विविध पदाधिकाऱ्यांच्याही निवडी जाहीर
ऊस वाहतूकदारांच्या प्रश्नासाठी संघटित प्रयत्न करणार - रायप्पा हळणवर
यावेळी प्रदीप थोरात, जीवन डुबल, सुभाष शिंदे, दिलीप व्होटे शिवाजी मेटकरी समाधान महारनवर कुंडलिक जगदाळे शंकर घाडगे मधुकर सुरवसे संभाजी चव्हाण रामहरि भोसले प्रभाकर चव्हाण मधुकर माने पांडुरंग घाडगे पोपट पवार संभाजी आयरे व इतर ऊस वाहतूकदार संघटनेचे सभासद उपस्थित होते या वेळी नवनियुक्त अध्यक्ष रायाप्पा हळणवर यांचा सत्कार प्रदीप थोरात यांच्या हस्ते करण्यात आला तसेच उपाध्यक्ष किसन अटकळे यांचा सत्कार धर्मेंद्र आबा घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला व सचिव पदी सिताराम कोळेकर यांच्या निवडी बद्दल आप्पा कोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या निवडीबद्दल सर्व ऊस वाहतूकदार व शेतकरी बंधूंनी आनंद व्यक्त केला
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना रायप्पा हळणवर म्हणाले कि,ऊस वाहतूक दर गेली ५ ते ६ वर्षांपासून कायम आहेत परंतु आज डिझेल चे भावात सातत्याने झालेली वाढ,टायरचे दर,वाहनदुरुस्ती खर्च, ऊस तोडणी कामगार यांची उचल ड्राव्हरचा पगार या सर्वांन मध्ये खुप वाढ झालेली आहे .ऊसवाहतूक दर वाढवून देण्यात यावा. टोळी भाडे इतर कारखान्यांच्या धोरणा प्रमाणे वाहनांचे येणे जाणे भाडे मिळाले पाहिजे. मायलेज दर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनास गावाचे कि.मी. ऐवजी ऊसच्या प्लॉटपासुन ( ऊसच्या फडापासुन) कि.मी.(मायलेज) धरण्यात यावे. ऊस दर आंदोलनामुळे वाहनांचे,टायरचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे ऊस वाहतूकदारांना आथिर्क नुकसानभरपाई कारखान्याने द्यावी तसा ठराव संमत करून वाहतूकदारांना न्याय मिळाला पाहिजे.मुकादम करारपत्र ऊस वाहतूकदार व मुक्कादम यांचे कराराबाबत कारखान्याने मुक्कादमास कायदेशीर बाबींची पूर्तता करून हमी घेऊन ऊस वाहतूकदारांना सहकार्य करावे. ऊस वाहतूकदारांना आथिर्क मदत कारखाना गाळप क्षमतेचा विचार करून अॅडव्हान्स हप्ता देण्यात यावा. ऊस वाहतूकदार हा कारखान्यांचा प्रमुख घटक आहे त्यामुळे त्यांनी मागीतलेल्या मागण्या रास्त आहेत शिवाय ऊस वाहतूकदार, संघटनेचे पदाधिकारी आपआपल्या कारखान्याचे ऊस उत्पादक, शेतकरी सभासद, कामगार हितचिंतक आहेत याचा विचार करून ऊस वाहतूकदारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी संघटना ठोस पाठपुरावा करणार आहे

