उत्सवकाळात पर्यावरणपूरक आचरण ही काळाची गरज - सीमा परिचारक
लोकमान्य विद्यालयातील पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे सर्वत्र कौतुक
पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालयात स्वच्छतेची शपथ घेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणपती ची मिरवणूक ढोल,ताशा व विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने करण्यात आली व शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते गणरायाचे विसर्जन करण्यात आले.शासन जलप्रदूषण रोखण्यासाठी खुप प्रयत्न करत आहे, योजना आखत आहे,पंढरपूर नगरपरिषदही शाळेमधील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे, शाळेमध्येच छोट्याशा जलतलावा मध्ये गणेशमूर्ती चे विसर्जन करुन लोकमान्य विद्यालय व्यवस्थापन समितीने आदर्श निर्माण केला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पर्यावरण स्नेही मातीच्या मूर्ती पाहून मान्यवरांनी त्याचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना मा.सौ.सीमाताई परिचारक यांनी सांगितले की पर्यावरणपूरक गोष्टी आचरणात आणणे काळाची गरज आहे. निर्सगात,पर्यावरणात असमतोल निर्माण झाला तर फार मोठ्या संकटाला आपणास सामोरे जावे लागेल.नगराध्यक्षा मा.सौ साधनाताई भोसले यांनी सर्व कार्यक्रम पाहून शालेय जीवनातील आठवण आल्याचे सांगितले.शाळा,शिस्त पर्यावरण या गोष्टी कडे लक्ष देणे महत्त्वाचे असलेचे सांगितले व विजेत्या खेळाडूंनी भविष्यात पुढील स्तरावर अशीच कामगिरी करावी नगरपरिषद सर्व सहकार्य करेल असे जाहिर केले. शिक्षण समीती सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले की शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी देशभक्ती व पर्यावरणाविषयी आवड निर्माण झाली तर नक्की तो विद्यार्थी जीवनात यशस्वी होईल.आपण निर्सगाशी कसेही वागलो तरी तो आपणास निवारा देतो म्हणून निर्सगाची काळजी घेेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक श्री डिंगरे सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, सूत्रसंचालन श्री दिपक इरकल सर यांनी केले व आभार श्री पवार सर यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोकमान्य विद्यालयातील सर्व,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षक श्री अभय आराध्ये,लामतुरे सर, न.प.आरोग्य विभागाचे शरद वाघमारे साहेब यांनी प्रयत्न केले.
सदर कार्यक्रमास महिला बालकल्याण सभापती रेणुका घोडके, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर,नवनाथ रानगट,नारायण शिंगण, कुस्ती मार्गदर्शक दीपक चव्हाण,चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

