गौरी सजावट स्पर्धेत लता देवमारे प्रथम

गौरी सजावट स्पर्धेत लता देवमारे प्रथम 

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने पुरस्कार वितरण 
 राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी पंढरपूर शहर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ लोकप्रिय जि.प.सदस्या तथा शिवरत्न फाऊंडेशन व डॉक्टर मॉम्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या  हस्ते पार पडला.  
         यावेळी लता आशोक देवमारे प्रथम, भावना पांडुरंग इंगळे द्वितीय, तर सरस्वती थोरात यांचा तृतिय क्रमांक आला असुन शमा तांबोळी, अंगणवाडी सेविका,  गोपाळपूर व संगीता साबळे यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.  या प्रसंगी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या  प्रदेश उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड,  जिल्हा निरीक्षक महिला निर्मलाताई बाविकर,  जि.प.सदस्या  सुनंदाताई फुले, पं.स.सदस्या प्रफुल्लता पाटील, डॉ.शिल्पाताई गडम, ओ.बी.सी.सेलच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई राऊत, मर्चंट बँकेच्या संचालीका  मंजुश्री भोसले, शहअध्यक्षा रंजनाताई हजारे, तालुका अध्यक्षा अनिता पवार,  राधा मल्पे, जि.प.सदस्य अतुल खरात,  डॉ.अमरजित गोडसे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष दीपक वाडदेकर, शहराध्यक्ष सुधीर भोसले, सचिव विजय काळे, कृष्णात माळी, अनिल सप्ताळ, मनोज आदलिगे,  युवकचे तालुकाध्यक्ष  अरुण आसबे, रणजित पाटील, रशीद शेख, शंकर शिंदे, प्रशांत घोडके आदी मान्यवर उपस्थित होतेे. स्पर्धेमध्ये 50 महिलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सुर्वणाताई बागल यांनी काम पाहिले.यांवेळी कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व युवती उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन  युवती राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहराध्यक्षा चारुशिला कुलकर्णी यांनी केले होते. कार्यक्रमाचे  आभार संगिता पाटील यांनी मानले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव