अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचा महामेळावा
आरक्षणाच्या लढयासाठी धनगर समाज तिसर्या पर्यायास बळ देणार ?
धनगर समाजातील प्रस्थापीत नेत्यांची भुमिका गुलदस्त्यात
गेल्या साठ वर्षाच्या सत्ताकाळात राज्यात दलित आदीवासी घटकांसह राज्यात सामाजिक संख्याबळात क्रमांक दोन चा दावेदार असलेला धनगर समाज आरक्षणाच्या आपल्या ह्ककापासून केवळ र आणि ड या एका अक्षराच्या फरकामुळे वंचीत राहीला आहे.केवळ एका अक्षराने धनगर समाजाच्या हातातोंडाशी आलेला घास शासनकर्त्यांनी काढून घेतल्यामुळे या समाजाात असंतोषाची प्रचंड खदखद असली तरी न्याय मिळेल या आशेने धनगर समाजाने राज्यातील सर्व राजकीय पयार्यास पाठबळ देवून पदरी भ्रमनिरास पाडून घेतला आहे.कॉग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असो अथवा भाजपा-सेना युतीचे सरकार असो या दोन्ही आघाडयांकडून धनगर समाजास केवळ आश्वासनाचे गाजर दाखविण्यात आले.धनगर समाजाने समाजातून आरक्षणाचा लढा देण्यासाठी पुढे आलेल्या नेतृत्वास विश्वासू म्हणून पाठबळ दिले की या प्रस्थापीत पक्षांनी धनगर समाजातील या नेत्यांना पदे देवून त्यांना आपल्या गोठात ओढत धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा वेळोवेळी कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे अशी भावना आता या समाजातील नव्या पिढीमध्ये निर्माण झाली आहे.आतापर्यंत आपण वंचीत राहीलो आता सत्तेची सुत्रेच आपल्या हाती घेवू आणि आपणच आपणास न्याय देवू या विचाराने संघटीत झालेला धनगरत समाजातील युवक उद्या सोलापूर येथे संपन्न होत असलेल्या वंचीत आघाडीच्या महामेळाव्यात उत्साहाने सहभागी होईल असे चित्र पहावयास मिळत आहे.
राजकीय बांधीलकी जोपासणार्या धनगर समाजातील नेत्यांच्या भुमिकेकडे समाजाचे लक्ष
सोलापूर जिल्ह्यात धनगर समाजाचे मोठया प्रमाणात वास्तव्य आहे.सोलापूर जिल्हयातील अनेक मतदार संघात धनगर समाजातील मतदारांची संख्या निर्णायक आहे.तर या समाजातील अनेक नेते जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालीका व ग्रामपंचायती आदींसह विविध सहकारी संस्था व राजकिय नेत्यांशी संबधीत संस्थामध्ये महत्वाची पदे भुषवीत आहेत.यापैकी बहुतांश नेते हे कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसशी संबधीत आहेत.त्यामुळे सोलापूर येथे होणार्या वंचीत आघाडीच्या महामेळाव्याबाबत धनगर समाजातील अशा प्रस्थापीत नेत्यांची भुमिका अजुन गुलदस्त्यात आहे.मात्र आरक्षणाचा लढा आणखी प्रबळ करु इच्छीणारा सामान्य धनगर युवक मात्र सोलापूर येथील मेळाव्याबाबत उत्साही असल्याचे दिसून येते.
अँड.प्रकाश आंबेडकर यांचा सोलापूर जिल्ह्यावरील राजकीय प्रभाव वाढला
एकीकडे केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारला कडाडून विरोध आणि त्याच वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांना जातीयवादी संबोधने यामुळे ऍड.प्रकाश आंबेडकर हे सद्या चांगलेच चर्चेत आले आहेत. वादग्रस्त विधानांमुळे ना.रामदास आठवले यांच्या राजकीय वाटचालीबाबत नाराज असलेला मागासवर्गीय युवक अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थनांर्थ मोठया प्रमाणात एकवटू लागला आहे.त्या मुळे सोलापूरतील शुक्रवारचा मेळावा हा जिल्ह्याच्या राजकारणास कलाटणी देणारा ठरु शकेल अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
