( पहा सोलापूर येथील सभेची क्षणचित्रे) 


सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी अँड. प्रकाश आंबेडकर यांनी रणशिंग फुंकले   

काँग्रेसवाले सरळ खात होते मोदी उधोगपतींना खाऊ घालत आहेत 

राफेल प्रकरणी शरद पवार यांनी मोदींची पाठराखण केल्याने अँड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली नाराजी 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभेसाठी शुक्रवारी रणशिंग फुंकले . 
        वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी दुपारी सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या विराट महासभेत ॲडव्होकेट आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रवादिचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर तोंडसुख घेतले.  " गली गली मे शोर है, पंतप्रधान मोदी चोर है " हा २०१९ चा नवीन नारा असल्याचे सांगत ॲडव्होकेट आंबेडकर यांनी राफेल विमान करारावरून राहुल गांधी यांनी उठविलेला आवाज आणि त्यांना चॅलेंज देत शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची केलेली पाठराखण यावरून दोघांचेही वाभाडे काढले. एकूणच आगामी निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच जाणार असल्यामुळे त्या राजकारणाला नितीमत्ता नाही हेच समजून घ्यावे लागणार असल्याचे मतही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 
          ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले , आरक्षणाच्या मुद्यावरून  केंद्र आणि राज्य सरकार टोलवाटोलवी करीत असल्याचे स्पष्ठ दिसून येते. वेगवेगळ्या समूहाला आरक्षणप्रश्नी आश्वासित करण्यात येत आहे. मराठा आरक्षण मोर्चामुळे मराठा-ओबीसी , मराठा - शेडूल्ड काष्ठ , मराठा - आदिवासी यांच्यात भांडणे लावण्यात आली. मराठा आरक्षणाच्या प्रश्न बाजूलाच राहिला. समाजासमाजात मात्र सरकारने वाद निर्माण केले. या परिस्थिती कोणीही उत्तर देण्यास तयार नाही. मागासलेला या शब्दाची जोपर्यंत व्याख्या केली जात नाही, सामाजिक , आर्थिक आणि मागासलेपणाची तपासणी होत नाही आणि त्यामध्ये हि व्याख्या येणार असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. आणि हा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर सुप्रीम कोर्टाने टाकलेली ५० टक्क्यांची अट समाजाचे स्वास्थ्य , कायदा, सुव्यवस्था टिकविण्यासाठी ७० टक्य्यांवर घेऊन गेले पाहिजे आणि हे फक्त सुप्रीम कोर्टचं करू शकते आणि आरक्षणाचा मार्ग निघू शकतो असेही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 
    ७० वर्षे ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनीच आरक्षणाचा हा प्रश्न मिटविणे गरजेचे होते. कायदेशीर व संविधानिक तोडगा निघणे महत्वाचे आहे असे सांगत आता सत्ता हस्तगत करूनच आम्हाला आमचे प्रश्न सोडवावे लागतील असा इशारा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिला. 
     २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि आरएसएस ला अर्थात नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी ज्या व्यापारी वर्गाने निधी दिला. आज त्याच व्यापाऱ्यांवर नरेंद्र मोदींनी परदेशी व्यापारी वर्गाला भारतात व्यापारास संधी देऊन नागडे करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यापाऱ्यांच्या हातात व्यापार ठेवायचा का नाही हे मोदीच ठरवीत आहेत. किरकोळ बाजार जगातील व्यापाऱ्यांसाठी खुली होणे हि नवी बाब नाही. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असतानासुद्धा भांडवली व्यापार येण्यासाठी खुले धोरणच स्वीकारले होते. त्यामुळे व्यापार्यांसारखी वैचारिक दिवाळखोरी दुसऱ्या कोणालाच नाही अशा शब्दात. आंबेडकर यांनी मोदींना निवडणुकीत आर्थिक साहाय्य करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तोंडसुख घेतले. मोदींनी जाताजाता जरी व्यापार खुला केला. तरीसुद्धा स्थानिक व्यापाऱ्यांना परदेशी बाजारपेठ आपण कोणत्याही परिस्थिती खुली करू देणार नाही असे आश्वासन देतानाच परदेशी भांडवलदारांच्या हातात आर्थिक नाड्या जाणार आहेत हे व्यापाऱ्यांनी ओळखले पाहिजे . एकूणच देशाच्या सार्वभौम सत्तेसाठी वंचित बहुजन आघाडी लढणार असल्याचेही  आंबेडकर यांनी स्पष्ठ केले.

नरेंद्र मोदींचे कार्पोरेट करप्शन - 
            काँग्रेसवाले सरळसरळ खात होते. नरेंद्र मोदी मात्र प्रथम दुसऱ्याला चारतात आणि आता तू मला भराव असे म्हणतात आणि पुन्हा माझे हात बरबटलेले नाहीत असे सांगत आपण स्वच्छ आणि  प्रामाणिक असल्याचा डांगोरा पिटतात. यावरूनच नरेंद्र मोदींचे हे कार्पोरेट करप्शन असल्याचे स्पष्ठ होते. मोदी व आरएसएस हे चोर व लुटारूंचे सरकार आहे. असा आरोपही  प्रकाश आंबेडकर यांनी केला. 

काँग्रेसबरोबर आम्ही समझोत्यास तयार  . मात्र  .. .. 
            नाशिकमध्ये आपण राफेलबाबत आवाज उठविल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना जाग आली. त्यांनी राफेलवरून पंत्रप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केल्यानंतर इकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाच चॅलेंज दिले आणि नरेंद्र मोदीं चांगला माणूस आहे. असे सांगत मोदींची पाठ थोपटली यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजकारण दिसून येते. काँग्रेसबरोबर आम्ही समजुत करायला तयार आहोत मात्र आघाडीत राष्ट्रवादीला घ्या अशी त्यांची अट  आहे . यावरूनच काँग्रेस आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबरच जाणार आहे आणि अशा राजकारणाला नीतिमत्ता नाही हे त्या ठिकाणी समजून घ्यावे लागणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव