एकलासपूर ते शिरगाव रस्ता दुरुस्ती करा अखिल भारतीय छावा
एकलासपूर ते शिरगाव रस्ता दुरुस्ती करा
अखिल भारतीय छावा संघटनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन
एकलास्पुर ते शिरगाव हा रस्ता अतिशय खराब झालेला असून या रस्त्याने जा-ये करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मोठा फटका सहन करावा लागत असून याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटना पंढरपूर यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, आहे 15 दिवसात रस्ताचे काम नाही झाले तर दिनांक 11/10/2018 रोजी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने एकलासपूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे
यावेळी जिल्हा अध्यक्ष नागेशजी गायकवाड,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सागर दादा कदम,पंढरपूर तालुका अध्यक्ष हणमंत घाडगे विधार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रविण घाडगे,गणेश सावंत विभागीय तालुका अध्यक्ष निखिल रोकडे तसेच छावा संघटनेचे कार्यकर्ते उपस्तीत होते

