जि.प. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद जगदाळे

तावशी जि.प. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद जगदाळे यांची निवड     

   जि.प.शाळेच्या सर्वांगीण विकासाठी संघटित प्रयत्न करणार - प्रमोद जगदाळे     

   पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुतन शाळा व्यवस्थापन समितीचे पुन :गठन करण्यासाठी पालक व प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत पालक सभेत सर्वानुमते शाळा व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध प्रमोद जगदाळे तर उपाध्यक्षपदी महादेव यादव यांची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सोनाली यादव, भारत यादव, मावळते अध्यक्ष सुनिल आसबे पाटील, पप्पू यादव, मा. उपाध्यक्ष अजित यादव इतर शिक्षणप्रेमी नागरिक बहुसख्येने उपस्थित होते . शाळेच्या कामकाजाचे व्यवस्थित रित्या आराखडा तयार करून त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, शाळाबाहय बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार, भौतिक सुविधा व लहान मुलांना आरओ चे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल शिखरे ( गुरुजी ) प्रास्ताविक भोसले गुरुजी व आभार प्रदर्शन बनसोडे गुरूजी यांनी केले.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव