‘विठ्ठल इन शर्ट ’ मधील लुटारुंना सदबुध्दी देणार ?

नियमित चालतो ‘कोण बनेगा करोडपतीचा खेळ’ आणि   भाडोत्री युवक वाजवतात टाळया !

ग्रामिण भागातील धनदांडगे ‘चेन स्किमरचे’ टार्गेट
   


पंढरपूर शहर व तालुक्यात सद्या विविध चेन स्किम व गुंतवणूक योजनांचा फायदा समजावून सांगत त्यांना आपल्या  कंपनीच्या वतीने आयोजीत कार्यक्रमास बोलावून विविध गुंतवणुकदारांनी कशी हजारात लाखात गुंतवणूक केली आणि अल्पावधीत ते कोटयावधींचे मालक झाले तेही घर बसल्या आणि विनाकष्ट हे पटवून देण्याचा गोरख धंदा मोठया प्रमाणात सुुरु आहे.एरव्ही कुठल्यातरी पानटपरीवर मावा खाताना आढळणारे अनके एजंट इन शर्ट करुन सुटाबुटात शहराच्या विविध हॉटेलमध्ये विशेषत: मध्यवर्ती परिेसरातील एका हॉटेलमध्ये मोठ मोठया गप्पा मारत गुंतवणूकीचे फायदे पटवून देत आहेत.वर्षा दोन वर्षात लाखभर रुपयांच्या गुंतवणूकीत कोटयाधीश झालेल्यांना(?) स्टेजवर बोलावून प्रझेंट करीत आणि आपल्या नेहमीच्या टाळ्या पिटणार्‍या यशस्वी कलाकारांसोबत शहरासह ग्रामिण भागातील अनेक धनिकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत.विशेष म्हणजे अशा बैठकांना  महिला वर्गाची उपस्थितीही मोठया प्रमाणात असते.साखळी पध्दतीच्या गुंतवणूक योजनेची माहीती देत दोनाचे चार,चाराचे आठ करीत आणि हीच चेन पुढे वाढत गेल्याने आपण कसे करोडपती होणार आहे हे प्रोजेक्टर वरील सरकती चित्रे,टॉय कोटातील सर,आणि दरवेळीचे उपस्थित राहून टाळ्या वाजविण्याची जबाबदारी पार पाडत असलेले युवक पटवून देण्यात यशस्वी ठरत आहेत.या प्रकारच्या अर्थिक घोटाळ्यात अनेक बडे मासे स्वत:हुन जाळ्यात फसत असल्याने आता विठ्ठल इन शर्ट मधील या सदबुध्दी देईल व हा गोरख धंदा ते बंद करतील एवढीच अपेक्षा आहे.
     चार यात्रा आणि ऊसाचे बील हा पंढरपूर शहर आणि तालुक्याचा उदरनिर्वाहाचा खरा आधार पण पुढे विविध वेतन आयोग लागू होत गेले आणि शिलकीतील अर्थकारणाला गुंतवणूकीचे वेध लागले.पण पंढरपूर शहराचा अर्थिक गुंतवणूक घोटाळ्याचा इतिहास केवळ तीन दशकाचा आहे.कामधेनू मंर्कटाईल क्रेडीट सोसायटी घोटाळा हा पंढरीतील अशा प्रकारचा पहिला ठरला होता.महात्मा फुले चौकात अलिशान वातानुकुलीत ऑफीस,दारावर गार्ड,आकर्षक फर्नीचर आणि प्रचंड व्याजदराचे अमिष याला बळी पडत पंढरीतील अनेक धनिकांबरोबरच कर्जाच्या अमिषाने पिग्मी खाते उघडणारे अनेकजण ‘कामधेनू’रात्रीत गायब झाल्यानंतर ... ला चिमटा घेवून शांत झाले होते.या नंतर पंढरीत अशा प्रकारचे अनेक गुंतवणूक घोटाळे झाले असून विविध योजना,व्याज दर,सागवानातील गुंतवणूकीपासून ते मोठ मोठया शहरानजिकच्या स्थावर मालमत्तामधील सामुहीक स्थावर गुंतवणूक अशा अनेक अमिषला बळी पडून या शहरातील अशिक्षित हमालापासून ते सुशिक्षीत प्राध्यापकापर्यंत अनेकांनी स्वत:हुन जाळ्यात अडकत कोटयावधींचा गंडा घालून घेतला आहे.यातील मजेदार बाब म्हणजे ‘गोणी’नामक एक औषध नियमित घेतल्याने आपण कसे रोगमुक्त होणार हे सांगत ‘गोणीच्या’ बाटल्या विक्रीच्या चेनस्किममध्ये भांडवल गमावून अनेकजण चिंता रोगग्रस्त झाले आहेत.पण पंढरपूर शहर व तालुक्यातील अशा ‘भाबडयांना’सर्वात मोठा फटका हा समृध्द जीवनच्या महेश मोतेवार आणि ‘साईप्रसाद’ च्या बाळासाहेब भापकर याचा आहे.विशेष म्हणजे साई प्रसाद गुंतवणूक प्रकरणातील एक दलाल हा रोज सत्र न्यायालय परिसरात आढळून येतो अशीही चर्चा आहे. 
       पंढरपूर शहरात कोटयाधीश बनविण्याच्या अमिषाला बळी पडणार्‍यांची संख्या अजुनही कमी नाही.शहराच्या मध्यवर्ती भागातील एका सभागृहात सहज फेरफटका मारला असता व सीसीटिव्ही फुटेज चेक केले तर कोण बनेगा करोडपतीचा हा खेळ किती बिनधास्त सुरु आहे हे दिसून येईलपण घरात लहान मुलाने चॉकलेटला पैसे मागीतले तर हात आखडता घेणारे अनेक महाभाग अमिषाला बळी पडून किमान दहा-पाच हजाराचा गंडा घालून घेत आहेत.पण तक्रार करण्याची त्यांच्यात धमक नसल्याने नवे सावज जाळ्यात ओढण्यासाठी दर आठ-पंधरा दिवसाला होणार्‍या बैठका सुरुच असून आता ‘विठ्ठल’इन शर्टमधील या लुटारु टोळयांपासून रक्षण करो एवढेच ! 

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव