पंढरपूर नगरपरिषद रमाई आवास घरकुल योजनेच्या २६१ घरकुलासाठी पहिल्या हप्त्याची ३ कोटी २६ लाख २५ हजार मंजूर
आ.प्रशांतराव परिचारक यांच्या पाठपुराव्यास यश
रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना निधीचे वाटपपंढरपूर शहरातील नागरिकांसाठी रमाई आवास घरकुल योजनेच्या २६१ लाभार्थ्यासाठी ३ कोटी २६ लाख २५ हजार निधी अनुदान नगरपरिषदेकडे प्राप्त झाले असून या निधीच्या वाटपाचा कार्यक्रम आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपनराध्यक्ष विशाल मलपे गट नेते अनिल अभंगराव गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक सुजीतकुमार सर्वगोड,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसलेयांच्या प्रमुख उपस्थीतीत संपन्न झाला कार्यक्रमाची सुरवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजननाने झाली.
यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी या २८१ घरकुल चा प्रस्ताव नगरपरिषदेने डिसेंबर २०१७ मध्ये समाज कल्याण विभागाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला होता.यावर या योजनेसाठी शासनाकडून निधी प्राप्त होत नसल्याने हा निधी मिळावा म्हणून समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले,पालकमंत्री विजयकुमार देशमुख, यांच्या माध्यमातून मी स्वता या निधी बाबत पाठपूरावा करून हा निधी मंजूर करुन आणला.प्रशासनाने २६१ प्रस्तावना दिनांक १५ मार्च २०१८ रोजी घरकुल निर्माण समितीकडून मंजूरी दिली असून या घरकुल चे अनुदान पोटी सहा कोटी ५२ लाख ५० हजार रुपये समाज कल्याण विभाग यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी नगरविकास विभाग यांना दिले आहेत. त्यापैकी पहिल्या हप्त्याची रक्क्म तीन कोटी २६ लाख २५ हजार इतकी रक्कम नगरपरिषदेकडे जमा झाली असून सदर रक्कम लाभार्थींच्या खाते वरती जमा करण्यात येणार आहे. आजपर्यंत नगरपालिकेमार्फत ९१६ घरकुल प्रस्तावांना मंजूरी मिळालेली असून त्यापैकी ८८६ लोकांना पहिला हप्ता व ३९५ लोकांना दुसरा हप्ता १०६ लोकांना तिसरा हप्ता यापूर्वी देण्यात आलेला आहे.त्याचबरोबर ६२४ लाभार्थ्याला दोन ब्लॅकेट व दोन सतरंजी आज देण्यात येत आहेत.तसेच शहरामधील ज्या नागरिकांना स्वताच्या मालकीची घरे नाहीत अशा नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन हजार घरे बांधणार असल्याची माहिती आमदार प्रशांतराव परिचारक यांनी दिली .
यावेळी नगराअध्यक्ष साधनाताई भोसले,यांनी नगरपरिषदेची माहिती दिली या कार्यक्रमास युवा नेते प्रणव परिचारक, संजय निंबाळकर, सुप्रियाताई डांगे,रेहना बोहरी,रेणुका घोडके,मालन देवमारे,विक्रम शिरसट,विवेक परदेशी, सचिन डांगे,आदित्य फत्तेपूरकर,मालोजी शेंबडे,श्रीनिवास बोरगांवकर, नवनाथ रानगट, ,तम्मा घोडके,बसवेश्वर देवमारे,आंबादास वायदंडे,गोविंद सर्वगोड,हे उपस्थित होते.यावेळी उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर,नगर अभियंता दिनेश शास्त्री,समुह संघटक,बालाजी प्रक्षाळे,व सर्व लाभार्थी मोठ्या संख्येने हजर होते.कार्यक्रमाचे आभार गट नेते अनिल अभंगराव यांनी मानले.

