राष्ट्रवादी कॉग्रेसकडून मोहोळ मतदार संघात पुन्हा ‘उपरा’ उमेदवार ?
राष्ट्रवादी समर्थकांमध्ये अस्वस्थता
भीमा-लोकशक्ती परिवार व शिवसेनेच्या भुमिकेकडे मतदारांचे लक्ष
मोहोळ विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार रमेश कदम हे सद्या तरुंगात आहेत.त्यामुळे या 17 गावातील जनतेला आमदार निधी अथवा इतर शासकिय योजनांच्या माध्यमातून अपेक्षीत असलेली विकास कांमे,वैयक्तीक कामे तसेच आमदारांच्या शिफारशीनुसार होणारी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून होणारी कामे यामध्ये मोठा खोडा घातला गेला आहे.तर या भागातील विविध प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी आमदारच उपलब्ध नसल्याने आमची कामे होत नाहीत अशी भावना या 17 गावातील मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.मोहोळ तालुक्यावर व या मतदार संघावर राजकीय’मालकी असलेल्या मा.आ.राजन पाटील यांची राजकीय टिम संभाळणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील हेही या भागात नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी फिॅरकत नव्हते मात्र निवडणुकीचे वर्ष जवळ येत चालले आहे म्हणून त्यांचे दौरे वाढले आहेत अशी चर्चा मागील काही महिन्यापासून होत असतानाच आम्ही दाद कुणाकडे मागायची असा सवाल या 17 गावातील मतदार करीत आहेत.
आ.रमेश कदम यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात या 17 गावांशी चांगलाच संंपर्क ठेवला होता.नदीकाठच्या गावातून होणारी अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी त्यांनी सोलापूर येथे भव्य मोर्चाही काढला होता.तर त्यांच्या खास शैलीत ते अधिकारी व कर्मचार्यांवर दबाव आणून जनतेची कामे करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत होते.मात्र आ.कदम हे सद्या कारागृहात बंदीस्त असल्याने मतदारांची व आमदारांच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवू असे आश्वासन देवून मतदारांना मतदान करण्यास भाग पाडलेल्या कार्यकर्त्यांची मोठीच गोची झाल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मा.आ.राजन पाटील यांचे मोहोळ तालुक्यावरील एकहाती वर्चस्व झुगारुन देण्याच्या हेतुने भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन खा.धनंजय महाडिक,लोकशक्ती परिवाराचे युवा नेतृत्व विजयराज डोंगरे यांच्यासह राजन पाटील यांच्या एकाधिकारशाहीस कंटाळलेल्या विरोदकांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपले स्वतंत्र पॅनल उतरवले व या निवडणुकीत भीमा-लोकशक्ती परिवाराने मोक्याच्या 3 जि.प. जागा पटकावल्या. जि.प.चे महत्त्वाचे सभापती आणि स्थायी समितीचे सदस्यपदही खेचून घेतले.
मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतर भीमा परिवाराचे सर्वेसर्वा व भीमा परिवाराचे सर्वेसर्वा खा.धनंजय महाडिक यांच्याबद्दलची नाराजी मोठया प्रमाणात वाढीस लागली.मोहोळ तालुका आणि भीमा कारखाना आणि भीमा परिवाराचे राजकारण हे खा.महाडिक यांच्यासाठी दुय्यम बाब आहे अशीच भावना आता त्यांच्या समर्थकांमध्ये वाढीस लागली आहे..साहजिकच याचा मोठा फटका विविध निवडणुकांमध्ये जीवाचे रान करुन प्रचार करणार्या निष्ठावंतांसह समर्थकांच्या उत्साहाला बसत आहे.गेली अनेक वर्षे मोहोळ तालुक्याच्या राजकारणावर आपला दबदबा राखणारे माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यामध्ये अलीकडेच राजकीय दरी निर्माण झाली आहे. या दोन्ही नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात सक्रिय असून मोहोळ तालुक्यात दोन्ही गटाकडून वर्चस्वासाठी निकाराचा राजकीय संघर्ष सुुुर आहे.खा.महाडिक यांच्या नेतृत्वाखालील भीमा सहकारी साखर कारखान्याने सभासद व ऊसऊत्पादकांच्या व कारखान्याच्या आजी - माजी कर्मचार्यांच्या हिताकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे खा.महाडिक यांच्याबाबत निर्माण झालेली नाराजीची भावना हा आगामी विधानसभा निवडणुकीत मा.आ.राजन पाटील गटासाठी अतिशय महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.मात्र याच वेळी जर मोहोळ विधानसभा मतदार संघाबाहेरील उपरा उमेदवार राष्ट्रवादीने दिल्यास त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीस सहन करावा लागणार आहे.

