रोहीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवजिवन अपंग प्रशालेत खाऊ वाटप

 

रोहीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नवजिवन अपंग प्रशालेत खाऊ वाटप



इंडियन शुगर मिल्स असोशियनचे अध्यक्ष,पुणे जिल्हा परिषद सदस्य व बारामती ऍग्रो इंडस्ट्रिजचे कार्यकारी संचालक रोहीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या वतीने नवजीवन अपंग प्रशालेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

    या बाबत अधिक माहीती देताना प्रतिष्ठाणचे जिल्हाकार्याध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले की,शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या माध्यमातून क्रिडा व सांस्कृतीक उपक्रमांना सदैव सहकार्य केले जाते.युवकांमधील क्रिडा गुणांना वाव मिळावा म्हणून प्रोत्साहन दिले जाते.प्रतिष्ठाणच्या या कार्यापाठीमागे प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक रोहीत पवार यांचे फार मोठे पाठबळ आहे.त्यामुळे आज त्यांचा वाढदिवस आम्ही या विधायक उपक्रमाने साजरा करीत आहोत.

       यावेळी प्रविण कोळेकर,प्रशांत पवार,सोमनाथ ढवण,बालाजी खंदारे,विनायक पवार,शहाजी गोडसे,विकास घोलप,ेविलास कवडे,हनुमंत चव्हाण आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव