जनरल स्टोअर्समधून प्रतिबंधित खाद्यपदार्थाची विक्री
अन्न विभागाने केले दुकान सील
जादा नफा कमाईच्या नादात दुकानदार कायद्याच्या कचाट्यात
(पहा कारवाईचे कारवाईचे चित्रीकरण )
सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित रोजच्या वापरातील खाद्यपदार्थात भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उत्पादन तारखेसह अंतर्भूत पदार्थांची यादी न देताच अनेक खाद्यपदार्थांची जिल्ह्यात सर्रास विक्री सुरू आहे.नागरिकांच्या रोजच्या जीवनात अनेक खाद्यपदार्थांची गरज लागते. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक कुटुंबे न्याहरीसह जेवणात बेकरीचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे चित्र आहे. बेकरी पदार्थांचा खरेदीदार वाढल्याने या पदार्थांच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. मात्र त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे सध्याचे चित्र आहे. होलसेलच्या नावाखाली अशा पदार्थांची विक्री जोमात आहे.तर काही किरकोळ विक्रेते जादा नफ्याच्या अमिषापोटी असा निकृष्ट दर्जाचा व अन्न विभागाने घालुन दिलेल्या मानांकाची पुर्तता न करणार्या उत्पादकांकडून निर्मित पॅकेज्ड खाद्यपदार्थ आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवतात.अन्न विभागाकडून वारंवार आवाहन करुन देखील अनेक दुकानदार याची दखल घेत नसल्याने जिल्हा अन्न प्रशासनाने या बाबत तपासणी व कारवाईचे आदेश दिले आहेत.
आज दि. 29/09/2018 रोजी मे.उत्कर्ष जनरल स्टोअर्स, करमाळा चौक,टेंभुर्णी ता.माढा,या दुकानाची तपासणी केली असता सदर ठिकाणी रूपये 6742/- किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला असता, सदर साठा जप्त करून पेढी सील करण्यात आली, सदरची कारवाई मा. सहाय्यक आयुक्त(अन्न) पी. एम. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या मदतीने पार पाडली.