पंढरपूर तालुक्यातील अवैध मटका त्वरित बंद करा
बहुजन ब्रिगेडची निवेदनद्वारे मागणी     


  
  पंढरपूर तालुक्यातील मटका त्वरित बंद करावा या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड चे जिल्हाउपाध्यक्ष नानासाहेब खंडाळे यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे,सदर निवेदनामध्ये नमूद केले आहे की,पंढरपूर तालुक्यातील गावामधील खुलेआम मटका चालू आहे ,त्यामधे पंढरपूर तालुक्यातील गावातील युवक वर्ग वाम मार्गाला जाताना दिसत आहे ,हा धंदा चालवणे कायद्याने गुन्हा असताना हा धंदा पंढरपूर तालुक्यामधील गावामध्ये जोमात चालू आहे आणि या धंद्याला कोणाचे अभय आहे ,हा चर्चेचा विषय पंढरपूर तालुक्यातील गावामध्ये चालू आहे .त्यामुळे हा धंदा करणाऱ्या लोकांना व ह्या धंद्याच्या मालकाला तडीपार करावे व धंदा त्वरित बंद करावा अन्यथा बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने दि-१०/१०/२०१८या दिवशी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल याची नोद घ्यावी.याचे निवेदन बहुज ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या अध्यक्षतेखाली  नायब तहसिलदार यांचेकडे देण्यात आले यावेळी ,रोहित गायकवाड किरण घोडके राजेश खरे नामदेव वाघमारे सागर घोडके हे उपस्थित होते
x

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव