पंढरपूर शहर तालुक्यातील एक हजार युवकांना स्वयंरोजगार तर पाचशे युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार- समाधान आवताडे 

 पंढरीत समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन



पंढरपूर शहर व तालुक्यातील किमान 1 हजार युवकांना स्वयंरोजगार व पाचशे युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार असून पंढरपूर शहर हे पर्यटन स्थळ आहे.या ठिकाणी पर्यटन स्थळाच्या द्रष्टीने अनेक छोटे मोठे व्यवसाय उभारले जावू शकतात यातून बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार व  थेट रोजगार उललब्ध होऊ शकतो मात्र या द्रष्टीने कधी प्रयत्नच होत नाहीत.व्यवसायाच्या माध्यमातून शिर्डी,शनी शिंगणापूर सारख्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी माझा संपर्क आला.तेथील नियोजन आणि विकासाची तळमळ पाहून मी प्रभावीत झालो.आज पंढरपूर असो अथवा मंगळवेढा या तालुक्यात रोजगाराच्या संधीच तयार होत नाहीत.मंगळवेढा तालुक्यात एमआयडीसी साठी जमीन संपादीत करण्यात आली.आणि यातील सव्वाशे एकर जमीन सोलर प्रोजेक्टला देण्यात आली.यात केवळ सहा लोकांना रोजगार उपलब्ध झाला ते लोकही बाहेरचे आहेत.जर अशा पध्दतीने आपल्याकडील युवकांची अहवेलना होणार असेल तर आम्ही स्वस्थ कसे बसू असा सवाल यावेळी सामाधान आवताडे यांनी उपस्थित केला.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,पंढरपूरात आज रिक्षा चालक आणि टांगा चालक यांची संख्या मोठी आहे.त्याच बरोबर रस्त्यावर विविध छोटे मोठे व्यवसाय करणार्‍यांची संख्याही मोठी आहे आणि हेच त्यांचे उदरनिवार्हाचे साधन आहे.मात्र यातून मिळणारे उत्पन्न आणि भांडवला अभावी रोखलेली प्रगती यामुळे हे युवक प्रगतीऐवजी  प्रपंचात गुुरफटून गेले आहेत.यांना प्रगतीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी संपर्क आणि नियोजन या माध्यमातून आपण ठोस उपाययोजना करणार आहोत. 
        यापुर्वी येथील भक्तीमार्गावरील समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उत्साहात उदघाटन करण्यात आले.यावेळी मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले,पांडुरंग सह.साखर कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन आप्पा जाधव,राजाभाऊ फुगारे,तुकाराम कुरे, पितांबर कापसे, मा. नगराध्यक्ष अरविंद जाधव,ल.टाकळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तानाजी कांबळे,शिवक्रांती संघटनेचे दत्ता काळे,माजी सैनिक महादेव नागटिळक,कृष्णा वाघमारे,शेखर भोसले,डॉ.सुधीर शिनगारे,मुन्ना मलपे आदी उपस्थित होते.
      यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले म्हणाले की,पंढरपूर शहरातील जनतेचे प्रश्‍न गेल्या दोन दशकापासून जैसे थे आहेत.कोटयावधींचा निधी येतो मात्र येथील नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.समाधान आवताडे यांच्या रुपाने जर एखादे प्रबळ नेतृत्व येथे ठोस विकास योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असेल तर येथील जनता नक्कीच त्यांच्या मागे उभा राहील.
    या उदघाटन कार्यक्रमास पंढरपूर शहर व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या 22 गावातील नागरिक विशेषत: युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

पंढरी वार्ता:- शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य न करणार्‍या नागरिकांवर आता दंडात्मक कारवाई !

आपलं पंढरपूर:- मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षणाचा निर्णय ! यापुर्वी आयोगाने फेटाळली होती शासनाची मागणी

पंढरी वार्ता :- विश्‍वस्त मंडळाबाबत खात्री करुनच शिक्षणाधिकार्‍यांची रा.म.साठे सरांच्या प्रस्तावाला मान्यता -संपत जाधव